Transit Treatment Center : जीव वाचला… पण क्षणभरासाठी थांबले श्वास ! जीव वाचविण्याची रोमांचक कहाणी

Top Trending News    11-Oct-2025
Total Views |
 

tras 
 
नागपूर : ( Transit Treatment Center ) नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरच्या वेगवान कार्यवाहीमुळे एका गंभीर जखमी घारीला नवजीवन मिळाले आहे. नागपूरच्या कामठी परिसरातील सुजाण नागरिक कमलेश कांबळे यांनी १७ सप्टेंबर रोजी ट्रांझिटच्या हेल्पलाइनवर संपर्क साधत जखमी घारीबाबत माहिती दिली. तत्काळ रेस्क्यू पथकाने घटनास्थळी पोहोचून गंभीर अवस्थेतील घार उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केली.
 
प्राथमिक तपासणीत ( Transit Treatment Center ) घारीची अवस्था अतिशय लुस्त असल्याचे दिसून आले. तिची अन्ननलिका पूर्णपणे फाटलेली होती, त्यामुळे अन्न किंवा पाणी घेतल्यावर ते फाटलेल्या भागातून बाहेर पडत होते. त्यामुळे ती अत्यंत अशक्त झाली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन अन्ननलिका शिवली व गळ्याला टाके मारले. काही दिवस तिला हाताने खाऊ देण्यात आला. काही काळानंतर जखम भरू लागली आणि घारीने स्वतः खाणे सुरू केले. सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पूर्णपणे बरी झाल्याचे प्रमाणपत्र देत निसर्गमुक्त केले.
 
या बचाव मोहिमेत ( Transit Treatment Center ) उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास, सहाय्यक वनसंरक्षक यश काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरचे समन्वयक कुंदन हाते यांच्या नेतृत्वात डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. प्रियल चौरागडे, पशुपर्यवेशक सिद्धांत मोरे, पंकज थोरात आणि प्रवीण मानकर यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरचा रिकव्हरी रेट ७९.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अनेक धोकाग्रस्त वन्यजीवांना येथे नवसंजीवनी मिळत आहे.