Morning Of Miracles : पहाटेचं गूढ तेज गडावर उजळलं ! रामभक्तांची अमाप गर्दी

Top Trending News    09-Oct-2025
Total Views |

Morning Of Miracles  
नागपूर/रामटेक : गडमंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या ( Morning Of Miracles ) दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या काकड आरतीचे रामटेकसह पंचक्रोशीतील रामभक्तांना विशेष आकर्षण असते. या काकड आरतीचा समारोप कार्तिक पौर्णिमेला होतो. रामटेककरांसाठी पर्वणीच असणारी काकड आरती मंगळवार (दि. ७) पासून सुरू झाली आहे. त्यामुळे गडमंदिरावर पहाटे काकडा आरतीचा स्वर निनादत असून हा क्षण निसर्ग, संस्कृती आणि श्रद्धेचा संगम ठरत आहे.
 
राजे रघुजी भोसले ( Morning Of Miracles ) यांच्या काळापासून गडमंदिरातील परंपरा आजतागायत जतन केल्या जात आहेत. त्यात काकड आरतीचा देखील समावेश आहे. काळाच्या ओघात काकडा आरतीला उपस्थित भाविकांची संख्या कमी झाली होती. मात्र, रामटेक येथे काकड आरती भक्त परिवार नामक संस्था स्थापन करून दैनंदिन दिंडी, प्रसाद वाटप, दिवाळी उत्सव, अशा नव्या परंपरा सुरू केल्यात.
 
रामटेक ( Morning Of Miracles ) हे सर्वार्थाने एक उत्तम धार्मिक व पर्यटनस्थळ मानले जाते. मनाला भुरळ पाडणारे येथील निसर्ग सौंदर्य, जलविहारासाठी उत्तम सरोवरे, पूर्वजांच्या स्मृती जपणारा अंबाळा अस्थी विसर्जन तलाव, प्रतिभेला प्रेरणा देणारे महाकवी कालिदास स्मारक आणि या सर्व वैशिष्ट्यांचा मानबिंदू अर्थात सुवर्ण कलशयुक्त येथील ऐतिहासिक प्रभू श्रीरामाचे मंदिरामुळे मोठ्या संख्येने पर्यटक नगरीत हजेरी लावतात. अनेक व्यासंगी अभ्यासकांनी रामटेक हे 'दक्षिण काशी' अशा शब्दात येथील पावन वातावरणाचे वर्णन केले आहे. यामुळे भाविकांची संख्या पुनश्च एकदा ओसंडून वाहू लागली. परिसरातील गावखेड्यातूनच नव्हेतर नागपूर, भंडारा येथील भाविक रामटेकच्या काकड आरतीला उपस्थिती ( Morning Of Miracles ) नोंदवू लागलेत.
 
नागपूरच्या शिवमुद्रा पथकाने दरवर्षी ढोलताशा वादनाने गडमंदिर परिसर दणाणून सोडला. त्यांच्याच प्रेरणेतून उभे राहिलेले स्थानिक रामराज्य ढोलताशा पथक सुद्धा दरवर्षी आपला सहभाग नोंदवत असते. सीतामाई रसोई घर या समर्पित संस्थेने अनेक वर्षे भाविकांची अल्पोपहार व्यवस्था सांभाळली आहे. काकडा आरती भक्त परिवार गत २७ वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करीत असतो. काकड आरती समारोपनिमित्याने श्री रामकृष्ण रथयात्रा काढण्याचा परिपाठ २०११ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे टिपूर पौर्णिमेच्या दिवशी गड मंदिर परिसरासोबतच रामटेक नगरी देखील दुमदुमून जाते. नगरीत श्रीराम पादुकांची रथयात्रेद्वारे मिरवणूक काढली जात असून यात रामटेकवासी भक्तिभावाने ( Morning Of Miracles ) सहभागी होतात.
 
पंडे यांचा चौथ्या पिढीतही सूर कायम
 
फार पूर्वी स्व. बाळासाहेब पंडे आपल्या दमदार आवाजात आरती आणि ध्यान सादर करीत. त्यांच्या उतारवयात त्यांचे सुपुत्र मुकुंदराव अनेक वर्षे आरतीचा आर्त सुर आळवत होते. कोरोना काळात त्यांच्या निधनानंतर विद्यमान पुजारी मोहन पंडे आणि त्यांचे उच्चशिक्षित चिरंजीव मंगेश पांडे यांनी समर्थपणे ही परंपरा चौथ्या पिढीतही सुरू ठेवली आहे. लक्ष्मण मंदिराचे पुजारी अविनाश पंडे, धनुभाऊ तसेच राम पंडे यांच्या संपूर्ण सहकार्याने काकड आरती आणि त्रिपुर पौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा होत असतो. प्रशासनाने स्थानिक सेवाभावी कार्यकर्त्यांना आवश्यक उत्तेजन आणि प्रेरणा दिल्यास ( Morning Of Miracles ) रामटेकच्या काकड आरतीचा नावलौकिक अधिक दूरवर पोहोचेल.
 
हेमाडपंथी बांधणीचे राम मंदिर
 
रामटेक गडावरील हेमाडपंथी बांधणीचे राममंदिर सुमारे ६०० वर्षापेक्षा अधिक पुरातन आहे. साधारणतः ८० बाय १४० फुटाच्या प्रस्तरावर हे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर उभे आहे. वीस वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने या स्थापत्य रचनेवरून चुना खरडून काढला आणि त्याचे मूळ स्वरूप भविकांसमोर आणले. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या राम झरोक्यातून रामटेकनगरीचे विहंगम दर्शन आणि तेथील आल्हाददायक गार वाऱ्याचा स्पर्श हे दोन्ही अनुभव केवळ अविस्मरणीय ( Morning Of Miracles ) आहेत.