Bharat Gaurav Train : दोन ज्योतिर्लिंग, एक दिव्य सफर ! ‘भारत गौरव’ ट्रेन नागपूरमधून सज्ज

Top Trending News    05-Nov-2025
Total Views |
 

bharat 
 नागपूर : ( Bharat Gaurav Train ) इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ची ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ १७ जानेवारी २०२६ रोजी रेवा येथून ‘दोन ज्योतिर्लिंगांसह दक्षिण दर्शन यात्रा’ घेऊन रवाना होणार आहे. ही ट्रेन मध्य प्रदेश आणि विदर्भातील यात्रेकरूंसाठी विशेष उपयुक्त ठरेल, कारण ती रेवा, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, इटारसी, बैतुल, नागपूर आणि सेवाग्राम स्थानकांवरून प्रवाशांना घेऊन जाणार आहे. या यात्रेत तिरुपती बालाजी, रामेश्वरम, मदुराई मीनाक्षी मंदिर, कन्याकुमारी आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग अशा प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा समावेश आहे. हा संपूर्ण प्रवास १० रात्री आणि ११ दिवसांचा असेल. याचे भाडे पुढीलप्रमाणे आहे – स्लीपर वर्गात प्रति प्रवासी ₹२०,४००, थर्ड एसी वर्गात ₹३३,७०० आणि सेकंड एसी वर्गात ₹४४,५०० (३एसी-मानक).
 
यात्रेकरूंसाठी अनेक सुविधा उपलब्ध
 
आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे मुंबई येथील गट महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले की हा एक सर्वसमावेशक टूर पॅकेज आहे. यात भारत गौरव ट्रेनच्या ( Bharat Gaurav Train ) विशेष एलएचबी कोचमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड भोजन व्यवस्था, दर्जेदार बसेसमधून स्थानिक दर्शन, नियुक्त हॉटेलमधील निवास, ट्रॅव्हल एस्कॉर्ट, प्रवास विमा, ऑन-बोर्ड सुरक्षा आणि हाऊसकीपिंग सुविधा यांचा समावेश आहे.
 
इच्छुक प्रवासी www.irctctourism.com
या संकेतस्थळावर किंवा अधिकृत एजंट्समार्फत हा टूर ऑनलाइन ( Bharat Gaurav Train ) बुक करू शकतात. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी आयआरसीटीसीची भोपाळ, जबलपूर, नागपूर आणि इंदूर येथील कार्यालये संपर्कासाठी उपलब्ध आहेत.