BJP Victory : नगरपालिकांवर भाजपचा भगवा ध्वज ! कॉंग्रेसचा ऐतिहासिक दारूण पराभव

Top Trending News    22-Dec-2025
Total Views |
 
 bjp 
 नागपूर : ( BJP Victory ) विधानसभेप्रमाणे जिल्हयातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा डंका कायम राहिला. काँग्रेसचा दारूण पराभव झाला. २७ नगराध्यक्षांपैकी २२ ठिकाणी भाजपचे ( BJP Victory ) नगराध्यक्ष निवडून आले. तर, जवळपास भाजपचे ३१७ नगरसेवक निवडून आले. कॉंग्रेसचे १२० नगरसेवक निवडून आले. शिंदे सेनेचे २५ नगरसेवक विजयी झाले. कॉंग्रेसचा जिल्हयातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे.
 
आगामी जिल्हापरीषद व महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने लिटमस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ( BJP Victory ) गोटात प्रचंड निराशा पसरली आहे. १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींमध्ये एकूण २७ ठिकाणी निवडणूका पार पडल्या. २ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान झाले. तर, २० डिसेंबरला न्यायालयाच्या निर्णयानंतर चार ठिकाणच्या ९ प्रभागांत मतदान झाले. रविवार, २१ डिसेंबरला सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली.
 
सुरुवातीच्या पोस्टल मतदानातही भाजपनेच आघाडी घेतली. त्यानंतर नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या मतमोजणीला सुरूवात झाली. बघता बघता सर्वत्र भाजपच्याच ( BJP Victory ) कमळाने आघाडी घेतली. नगरसेवकही मोठया संख्येने निवडून आले. अनेक ठिकाणी तर भाजपचेच नगरसेवक निवडून येत होते. त्यामुळे जिल्ह्यात भाजप ( BJP Victory ) आघाडीवर होता तर कॉंग्रेसच्या पिछाडीचे चित्र पाहायला मिळाले. आगामी दिवसांत महापालिका व जिल्हापरीषदांच्या निवडणुका असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
 
भाजप एकसंघ, विरोधक विखुरले
 
या निवडणुकीत भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. कॉंग्रेसमध्ये मात्र विभागणी दिसायला मिळाली आहे. अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षाची साथ सोडली. तर, अनेक ठिकाणी कॉंग्रेसला योग्य उमेदवार देता आला नाही. भाजपने ( BJP Victory ) छोटया छोटया बैठका व वस्त्यांवर लक्ष केंद्रीत केले. कॉंग्रेसने स्थानिकांवर संपूर्ण जबाबदारी सोडून हात झटकून घेतले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नियोजनात फार मोठे अंतर दिसले. एकसंघ होऊन लढलेली भाजप विजयी ठरली. विखुरलेली कॉंग्रेस पराभूत झाली.
 
काटोलात देशमुख, रामटेकात जयस्वाल
 
काटोलमध्ये राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेकापसोबत जात विजयाचे गणित साधले. तर, मोहप्यात कॉंग्रेसचा स्थानिक उमेदवार स्वबळावर निवडून आल्याचे सांगितले जाते. महायुतीतील शिंदे सेनेने रामटेक व पारशिवनीत झेंडा रोवला. येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पक्षाचा विजय ( BJP Victory ) खेचून आणला. बुटीबोरीत गोंडवाना गणतंत्र पाटींच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला कॉंग्रेसच्या समर्थनाचा फायदा झाल्याने विजय मिळाला.
 
जनतेच्या विश्वासासमोर नतमस्तक
 
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला अभूतपूर्व विजय हा जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या विश्वासाने महाराष्ट्रातील जनतेने कमळाला मतदान केले, त्याच विश्वासाची पुनरावृत्ती आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झाली आहे.
-चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री व प्रभारी, भाजप राज्य निवडणूक
अनपेक्षित निकाल
 
निकाल अनपेक्षित आहे. माध्यमांनी केलेल्या सवेंक्षणातही १२ ते १३ जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एकाच बाजूने निकाल आल्याने मतदारांमध्येही संभ्रम आहे. या सर्व निकालाची चौकशी करू, तपासणी करू. आत्मचिंतनही करण्यात येईल. अपक्षही मोठया संख्येत नसताना असा निकाल येणे शंका वाढविणारा आहे.- श्यामकुमार बवें, खासदार, रामटेक
असा झाला पक्षनिहाय विजय-
 
नगराध्यक्ष :
 
-भाजप-२२
-शिंदे सेना-२
-कॉंग्रेस -१
-गोंगपा-१
-शेकाप-राष्ट्रवादी(शप)-१
---------------------------------------------------
 
नगरसेवक - नगरपरिषद :
 
एकूण प्रभाग- १७०
-एकूण जागा-३४४
-भाजप-२०१
-कॉंग्रेस-५५
-शिंदे सेना-१३
-राष्ट्रवादी(अ.प)-१
-ठाकरे सेना-२
-राष्ट्रवादी(श.प)-१७
-अपक्ष-१५
 
-इतर (गोंडवाना व इतर छोटे पक्ष)-१९
 
--------------------------------------------
 
नगरपंचायत :
 
-एकूण प्रभाग-२०४
-एकूण जागा-२०४
-भाजप- ११३
-कॉंग्रेस- ५२
-शिंदे सेना-१६
- राष्ट्रवादी (अ.प)- १
-ठाकरे सेना- २
-राष्ट्रवादी(श.प)- ५
-अपक्ष- १५