नागपूर : ( Urban Transformation ) जनतेने महायुतीला प्रचंड मोठे समर्थन दिले. राज्यात भाजपचे १२९ नगराध्यक्ष व जवळपास ३३०० नगरसेवक निवडून आले. याचा अर्थ प्रचंड मोठा जनाधार मिळाला आहे. विधानसभेसारखा विजय मिळाला. या निवडणुकीच्या विचारधारेचा उल्लेख करत या निवडणूकीत पूर्ण सकारात्मक प्रचार केला. ( Urban Transformation ) एकही सभेत एकही व्यक्तीच्या विरोधात, पक्ष वा नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मत मागितली आहे. आम्ही काय केलं, आम्ही काय करणार याची ब्लू प्रिंट मांडली होती. त्यामुळे जनतेने निवडून दिले. ही देशातील पहिली निवडणूक असेल, ज्यात एक मुख्यमंत्री म्हणून कुणावरही टीका न करता प्रचार केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मंत्रीगणांनी समन्वय ठेवून विजय मिळविला. ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत.
राज्यातील जनतेने एकदा पुन्हा महायुतीवर विश्वास व्यक्त केला. हा विकासकामांचा विजय आहे. भाजपच राज्यात नंबर वनचा पक्ष असल्याचे जनतेने पुन्हा अधोरेखीत केले. त्यामुळे विकासाची कामे आणखी वेगाने करीत शहरांचा चेहरामोहरा बदलवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Urban Transformation ) यांनी नागपुरात दिली. नगरपरिषद , नगरपंचायतीमध्ये मिळालेल्या महायुतीच्या अभुतपुर्व विजयाबद्दल उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही त्यांनी अभिनंदन केले. तसेच, हा टीम भाजपचा विजय असल्याचे मत व्यक्त पत्र परिषदेत व्यक्त केले. फडणवीस म्हणाले, जे भाकित केले, ते खरे ठरले. एकूण ७५ टक्के महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले.
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर व गडचिरोली जिल्हयात चांगले यश मिळाले. जिंकलो वा हरलो तेव्हाही पळालो नाही. कार्यकतें आमच्यासाठी लढले, आम्हीही त्यांच्यासाठी लढलो. करंटेपणा दाखविला नाही. कामठीत ३५ वर्षानंतर प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. १५ ठिकाणी अत्यल्प कमी मतांनी नगराध्यक्ष हरले.
मुनगंटीवारांना ताकद देऊ
पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार ( Urban Transformation ) यांनी चंद्रपुरात पक्षाने ताकद कमी दिल्याचा उल्लेख केला. त्यावर यापुढील काळात मुनगंटीवारांना ताकद देऊ. त्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर मनपात विजय खेचून आणू, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. या निवडणुकीपेक्षा मनपात यापेक्षाही जास्त मोठे यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.