Exam Controversy : परीक्षा प्रक्रियेत मोठा घोटाळा ? ब्लॅकलिस्टेड कंपनीवर काम दिल्याने गोंधळ

Top Trending News    26-Dec-2025
Total Views |
 
controvery e
 
नागपूर : (Exam Controversy ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे महत्त्वाचे काम ब्लॅकलिस्टेड असलेल्या ‘कोएम्प्ट एज्यु, टेक प्रा. लि.’ या कंपनीला कसे देण्यात आले, असा गंभीर सवाल भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) उपस्थित केला. संबंधित विभागाच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत एनएसयूआयने विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला आहे. या प्रकरणी कुलगुरूंनी चौकशीसाठी समिती (Exam Controversy ) स्थापन करण्याचे आश्वासन दिले.
 
एनएसयूआयच्या (Exam Controversy ) शिष्टमंडळाने मंगळवारी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आगामी ३ वर्षांसाठी कोएम्प्ट एज्यु कंपनीसोबत करण्यात आलेला करार नियमबाह्य असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. टेंडर प्रक्रियेदरम्यान कंपनीने सादर केलेली अनुभव प्रमाणपत्रे, आवश्यक कागदपत्रे तसेच पूर्वीच्या कामकाजाची नोंद यांची योग्य पडताळणी न करता करार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
 
एनएसयूआयने (Exam Controversy ) असेही नमूद केले की, सध्या ‘कोएम्प्ट’ या नावाने कार्यरत असलेली ग्लोबरेना टेक्नॉलॉजीज प्रा. लि. ही कंपनी विविध विद्यापीठांमध्ये यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यावर कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी उच्चस्तरीय समिती गठीत करून निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी एनएसयूआयतर्फे अजित सिंह, आशिष मंडपे, प्रणय सिंह ठाकूर, विद्यासागर त्रिपाठी, सुमित पाठक, आयुष गोरले आदी पदाधिकारी उपस्थित होते.