New Year Safari : सेलिब्रेशन कडक, थरार दुप्पट ! थर्टी फर्स्टला उमरेड कऱ्हांडल्यात व्याघ्रसफारीचे क्रेझ

Top Trending News    30-Dec-2025
Total Views |

safari
 
नागपूर : ( New Year Safari ) वर्षाचा शेवट गोड व्हावा, यासाठी नागपुरातील असंख्य कुटुंबांनी वन पर्यटनाचा पर्याय स्वीकारला आहे. काहींनी ताडोबा तर काहींनी पेंचला पसंती दिली आहे. मात्र, उमरेड कऱ्हांडल्यातील गोठणगावची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. पुढील ३ दिवसांचे व्याघ्रसफारीचे बुकिंग फुल्ल झाले असून, एफ-२ वाघिणीच्या बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटक आतूर झाले आहेत.
 
अनेकदा व्याघ्र प्रकल्पांना ( New Year Safari ) भेट देऊनही व्याघ्रदर्शन न घेताच पर्यटकांना माघारी फिरावे लागते. मात्र, गोठणगावमध्ये अशी वेळ शक्यतोवर येत नाही. येथे आलेल्या बहुतांश पर्यटकांना उमरेड कऱ्हांडल्याची महाराणी एस-२ वाघीण स्वतःच्या ५ बछड्यांसह दर्शन देतेच आणि समाधानी करून परत पाठविते. गतवर्षीचे अखेरचे दिवस गोठणगाव व्याघ्र सफारीसाठी ( New Year Safari ) कटू ठरले होते. काही वाहनांनी एफ-२ वाघिणीच्या बछड्यांचा मार्ग अडविल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेत व्याघ्रसफारीचे नियम अधिक कडक केले. न्यायालयाच्या आदेशानंतर वन व्यवस्थापनाने एसओपी (मानक कार्यपद्धती) जाहीर केली. या पुढाकारामुळे गोठणगावची सकारात्मक चर्चा झाली आणि उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली. तेव्हापासून अभयारण्यातील एस-२ वाघीण वन्यजीवप्रेमी व पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरली आहे.
 
बछड्यांचे आकर्षण
 
एफ-२ वाघीण तिची मजबूत शरीरयष्टी आणि उत्कृष्ट शिकारी कौशल्यामुळे विशेषत्वाने ( New Year Safari ) ओळखली जाते. ती तिच्या ५ बछड्यांसह संपूर्ण अभयारण्यात फिरताना दिसते. कधी तलावात खेळते, तर कधी गवतावर विसावलेली असते. पर्यटकांचे वाहन दिसताच बछडे उत्साहाने समोर येतात. हा क्षण पर्यटक डोळ्यांमध्ये साठवून घेतात.
 
सौंदर्य आणि जैवविविधतेचे आकर्षण
 
उमरेड कऱ्हांडल्याने ( New Year Safari ) नेहमीच पर्यटकांना व्याघ्रदर्शनाचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील निसर्गसौंदर्य आणि समृद्ध जैवविविधता पर्यटकांना कायम आकर्षित करीत आली आहे. ताडोबा व पेंचचे पर्याय उपलब्ध असतानाही उमरेड कऱ्हांडल्याची निवड करणे कधीही चुकीचे ठरत नाही, असे गत १० वर्षांपासून व्याघ्रसफारीचा अनुभव असलेले साकेत येवलेकर यांनी सांगितले.