External Affairs Minister S. Jaishankar ब्रिटनमध्ये परराष्ट्र मंत्र्यांसमोरच ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा ! सुरक्षा यंत्रणा सतर्क

Top Trending News    07-Mar-2025
Total Views |

external
 
लंडन : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर External Affairs Minister S. Jaishankar सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी ते महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. मात्र त्याअगोदर जयशकंर लंडनमध्ये पोहचताच खलिस्तानी दंगलखोरांनी पुन्हा एकदा सर्व मर्यादा ओलांडल्या. लंडनमधील चॅथम हाऊसबाहेर खलिस्तानी दंगलखोरांनी गोंधळ घातला त्यासोबतच जयशंकर External Affairs Minister S. Jaishankar त्यांच्यासमोरच खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या. वृत्तसंस्थेनुसार, खलिस्तान समर्थक निदर्शकांनी चॅथम हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. ज्याठिकाणी परराष्ट्र मंत्री जयशंकर External Affairs Minister S. Jaishankar यांनी चर्चेत भाग घेतला होता. इमारतीबाहेर निदर्शकांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
 

परराष्ट्र मंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या
 
सध्याच्या ब्रिटन दौऱ्यात, परराष्ट्र मंत्री जयशंकर External Affairs Minister S. Jaishankar यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर External Affairs Minister S. Jaishankar यांनी 5 मार्च रोजी लंडनमधील 10 डाउनिंग स्ट्रीट येथे ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा दिल्या. त्यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला चालना देण्यावर आणि लोकांमधील देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा केली.