दिल्ली : ( Bhagavad Gita Global Recognition ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी हा निर्णय भारतीय संस्कृतीच्या जागतिक महत्त्वाच प्रतीक आहे असे म्हटले आहे. यामुळे देशाचा सांस्कृतिक ठसा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाल्याचेही ते म्हणाले आहे.
भारतीय संस्कृतीचा जगभर बोलबाला
आपल्या सोशल मीडिया संदेशात पंतप्रधानांनी भारतीय संस्कृती जगभरात प्रभाव पाडत असल्याबद्दल समाधान ( Bhagavad Gita Global Recognition ) व्यक्त केले. त्यांनी जोनास मसेटी आणि त्यांच्या टीमसोबतच्या भेटीचा उल्लेखही केला आहे. ज्यांनी संस्कृतमध्ये रामायणाचे सादरीकरण करून भारतीय परंपरेचा जागतिक प्रचार केला. पूर्वी सुद्धा पंतप्रधान मोदींनी गीता प्रेसच्या योगदानाचेही कौतुक केले होते. गोरखपूर येथील एका कार्यक्रमात त्यांनी गीता प्रेसला ‘एक श्रद्धेचे प्रतीक’ असे संबोधले ( Bhagavad Gita Global Recognition ) होते. त्यांचे गौरवोद्गार होते, जिथे गीता आहे, तिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे कृष्ण आहेत, तिथे करुणा व कृती आहे.
युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश हा भारताच्या प्राचीन ग्रंथांना मिळालेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे. हे ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ नसून भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि तत्त्वज्ञान यांचे मूळ आहेत. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी गरबा नृत्याच्या युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशात झालेल्या समावेशाबद्दलही आनंद व्यक्त केला होता. त्यांनी गरबाला “जीवन, एकता आणि पारंपरिकतेचा उत्सव” असे संबोधले होते. या घडामोडींमुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर अधोरेखित केले गेले असून, पंतप्रधानांनी याविषयीचा अभिमान व्यक्त ( Bhagavad Gita Global Recognition ) केला आहे.
युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या कालातीत विद्वत्तेला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जगन्मान्यता आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समावेशाची प्रशंसा केली आहे.
यावर, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या एक्सवरील एका पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिले :
“जगातील प्रत्येक भारतीयासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. ”
युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता ( Bhagavad Gita Global Recognition ) आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे म्हणजे आपल्या कालातीत विद्वत्तेला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जगन्मान्यता आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने अनेक शतकांपासून संस्कृती आणि चेतना यांची जोपासना केली आहे. त्यांची अंतर्दृष्टी जगाला कायम प्रेरणा देत राहील.