Teacher Uniform : आता शिक्षकही गणवेशात ! कोणाकडून मिळणार निधी ?

Top Trending News    19-Apr-2025
Total Views |
 
dada
 
नाशिक : ( Teacher Uniform ) नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत भुसे म्हणाले, शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात ( Teacher Uniform ) दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे. पालकांनी मुलांशी संवाद साधावा. शाळांनी शैक्षणिक सहलींसारखे विविध उपक्रम राबवून मुलाचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल याचा सातत्याने विकास करावा, असे आवाहन भुसे यांनी केले.
 
 
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. शालेय शिक्षकांसाठी लवकरच ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. या उपक्रमासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांचा एकसंध व आदर्श प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येत असल्याचेही सूत्रांकडून समजते.
 
मालेगावच्या अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या दप्तराचे वितरण करण्यात आले. यावेळी भुसे बोलत होते. शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत. राज्यातील काही शाळांमधील शिक्षकांना ड्रेसकोड आहे. तर काही जिल्ह्यातील शाळांमध्ये नाही. त्यामुळे सरकार सर्वच शाळांमधील शिक्षकांना गणवेश अनिवार्य करणार असल्याचे भुसे यांनी म्हणाले.