PM Narendra Modi : पंतप्रधानांचा चेहरा बोलू लागला ! 11 वर्षात पहिल्यांदाच भावनांचा उद्रेक ?

Top Trending News    24-Apr-2025
Total Views |

pmm
 
दिल्ली : ( PM Narendra Modi ) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा एक दिवस आधीच संपवला आणि बुधवारी सकाळी भारतात परतले. परतताच त्यांनी विमानतळावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीदरम्यान समोर आलेल्या एका छायाचित्रात पंतप्रधान थोडेसे थकलेले, आणि चेहऱ्यावर चिंता व निराशा स्पष्ट दिसून ( PM Narendra Modi ) आली. गेल्या ११ वर्षांतील हा पहिलाच प्रसंग आहे, जेव्हा पंतप्रधानांचा चेहरा इतका उदास आणि थकलेला दिसला.
 
प्रवासामुळे झालेल्या थकव्याची तमा न बाळगता, पंतप्रधानांनी काश्मीरमधील हल्ल्याबाबत सखोल माहिती गोळा करायला सुरुवात केली. सौदी अरेबियातूनच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काश्मीरला तत्काळ रवाना होण्याचे आदेश दिले होते. या हल्ल्यानंतर, पंतप्रधान यंत्रणेमधील त्रुटींवर नाराज होते, अशी माहिती आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेनंतरही अशा प्रकारची घटना घडल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केल्याचे ( PM Narendra Modi ) सांगण्यात आले.
 
पाकिस्तानच्या हवाई हद्देपासून दूर
 
सौदी अरेबियाहून परतताना पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्देचा वापर टाळला. सौदीला जाताना मात्र त्यांनी पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर केला होता. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा संशय असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधानांनी दोषींचा शोध घेण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले असून, यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा केली.
 
कार्यक्रम रद्द, निवडणुकीवर परिणाम ?
 
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी गुरुवारी कानपूर येथील कार्यक्रम रद्द केला असून, भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी देखील पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. पंतप्रधानांचा बिहारमधील मधुबनी येथील कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नसल्याचे समजते. हा कार्यक्रम बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात होता.