Pahalgam Attack : मोदी - शहांचा राजीनामा मागा ! कोण म्हणालं, वाचा सविस्तर

Top Trending News    25-Apr-2025
Total Views |
 
shah modi
 
दिल्ली : ( Pahalgam Attack ) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या गंभीर घटनेनंतर सरकारने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, सरकारने त्याचा तीव्र निषेध केला आहे.
 
गृहमंत्री अमित शहा तात्काळ काश्मीरला भेट देऊन घटनास्थळाचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, हल्ल्याच्या तपासाची माहिती घेतली आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक ते निर्देश दिले. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले आणि मदतीचे आश्वासन दिले. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन ( Pahalgam Attack ) दिले.
 
सुब्रमण्यम स्वामी मागणी
 
पहलगाम येथील हल्ल्यात पर्यटकांना नाव, धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानकडून बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. केंद्र सरकारही या बाबतीत पावले उचलत असताना, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला ( Pahalgam Attack ) आहे.
 
सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधीही मोदी सरकारच्या अनेक धोरणांविरुद्ध भूमिका घेतली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर मोदी आणि शहा यांच्या विरोधात टीका केली. ते म्हणाले, "पाकिस्तानच्या बदल्याआधी मोदी आणि शहा यांचा राजीनामा मागा. चीन, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश यांच्याशी अनेक वेळा त्यांची परीक्षा घेतली गेली आहे आणि प्रत्येकवेळी त्यांनी शरणागती पत्करली आहे, ज्यामुळे भारतमातेला अपमानित केले आहे."