Pahalgam Attack : हादरवून टाकणारा दिवस, काश्मीरमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं ?

Top Trending News    25-Apr-2025
Total Views |

attack
 
दिल्ली : ( Pahalgam Attack ) 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान व्हॅलीमध्ये झालेल्या अचानक दहशतवादी हल्ल्यात किमान 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले. शांततेने नटलेली ही निसर्गरम्य जागा क्षणात दहशतीच्या सावटाखाली आली. सुरक्षा यंत्रणांना तातडीने शोधमोहीम सुरू करावी लागली. हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी तात्काळ घरचा रस्ता धरला. काही पर्यटकांनी सांगितले की, हल्लेखोरांनी धार्मिक चिन्हे जसे की टिकली, चंदनाचा टीका, यांची विचारपूस केली. काहींना "अल्लाहु अकबर" म्हणायला लावले, तर काहींना त्यांच्या धर्माची खात्री करण्यासाठी कपडे उतरवायला लावले. ( Pahalgam Attack ) या प्रकारांमुळे अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला.
 
शिवमंदिरात गेले म्हणून वाचले जीव
 
मुंबईतील एका जोडप्याला भूक लागल्यामुळे ते बैसरानऐवजी शिवमंदिरात गेले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला. देवराज घोष आणि त्यांची पत्नी बंगालमधून आले होते. त्याचप्रमाणे, सुदीप्तो दास आणि त्यांच्या पत्नीने देखील मंदिरात गेले म्हणून बचाव झाल्याचे ( Pahalgam Attack ) सांगितले.
 
केरळच्या पर्यटकांचा थोडक्यात बचाव
 
केरळहून आलेल्या 23 पर्यटकांच्या गटाने घोडेस्वारी नाकारली आणि जवळच्या दुसऱ्या स्थळी गेले. त्यांच्या निर्णयामुळेच ते या हल्ल्यातून बचावले. गटातील एका महिलेने सांगितले, "घोडेस्वारीचे भाडे महाग वाटल्यामुळे आम्ही टॅक्सीने दुसऱ्या दिशेने निघालो. तेव्हाच मोठा आवाज आला, दुकानं बंद झाली आणि लोक पळायला लागले. आमच्या गाईडने आम्हाला सुरक्षित ठिकाणी नेलं."
 
स्थानिकांची मदत जीवनदायी ठरली
 
महाराष्ट्रातील साक्षी आणि कृष्णा लोलगे हे नांदेडहून आलेले जोडपे सुद्धा पहलगामला आले होते. "आम्ही घटनास्थळावरून निघून फक्त 15-20 मिनिटे झाली होती आणि तिथेच हल्ला झाला," असे त्यांनी एका व्हिडीओत सांगितले. त्यांनी स्थानिकांचे आभार मानले, ज्यांनी त्यांना सुरक्षित हॉटेलपर्यंत पोहोचवले.