BSF Jawan Detained : "भारताचा वीर पाकिस्तानच्या तावडीत ! कधी होणार सुटका ?"

Top Trending News    26-Apr-2025
Total Views |

detaind 1
 
 
( BSF Jawan Detained ) २४ एप्रिल २०२५ रोजी पंजाबमधील फिरोझपूर सीमाजवळ एक धक्कादायक घटना घडली. सीमा सुरक्षा दलातील (BSF) जवान पी. के. सिंग चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आणि तिथे पाक रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले. शेतकऱ्यांसोबत गस्त घालत असताना तो थोडा पुढे सावलीत विश्रांतीसाठी गेला आणि त्याच मी वेळी पकडला गेला. पी. के. सिंग हे १८२व्या बटालियनचे सदस्य आहेत. घटनेनंतर, BSF ने पाकिस्तानी रेंजर्स सोबत फ्लॅग मिटिंग घेऊन जवानाला परत मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या तो निष्फळ ठरला आहे. पाकिस्तानकडून जवानाच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली, त्याची एके-४७ आणि इतर सामग्रीसह काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली ( BSF Jawan Detained ) आहेत.
 
भारत सरकारने या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली असून, राजनैतिक स्तरावर जवानाची सुटका लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहलगाम मधील अलीकडील दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आधीच तणावपूर्ण ( BSF Jawan Detained ) असताना ही घटना घडल्याने चिंता अधिक वाढली आहे.
 
अशा घटना पूर्वीही घडल्या आहेत जिथे चुकून सीमा ओलांडलेल्या जवानांना परस्पर संवादातून परत मिळवले गेले. २०१९ मध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे प्रकरण त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे आशा आहे की पी. के. सिंग यांचीही ( BSF Jawan Detained ) लवकरात लवकर सुखरूप सुटका होईल.
 
पाकिस्तानात अडकलेले व तिथून परतलेले वा आजही बेपत्ता असलेले भारतीय वीर
 
१. १९७१ चे 'मिसिंग ५४'
 
१९७१ च्या युद्धात ५४ भारतीय जवान बेपत्ता झाले आणि पाकिस्तानने त्यांना युद्धकैदी म्हणून ठेवले. आजही त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांना अजूनही त्यांच्या परतीची आशा आहे.
 
२. कुलभूषण जाधव प्रकरण
 
२०१६ मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांना अटक केली. त्यांच्यावर गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला. भारताने हा आरोप फेटाळून, ते इराणहून अपहरण करून नेले असल्याचा दावा केला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या मृत्युदंडाला स्थगिती दिली.
 
३. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान
 
२०१९ मध्ये पाकिस्तानात त्यांचे विमान कोसळल्यामुळे त्यांना तिथे अटक करण्यात आली. ५८ तासांनंतर पाकिस्तानने त्यांना शांततेच्या संदेशादाखल भारतात परत पाठवले.
 
४. चंदू बाबूलाल चव्हाण
 
२०१६ मध्ये नियंत्रण रेषा चुकून ओलांडल्यामुळे चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने अटक केली. चार महिन्यांनी ते भारतात परतले.