Modi Employment Drive : तरुणांसाठी सुवर्णसंधी ! मोदींच्या हस्ते ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण

Top Trending News    26-Apr-2025
Total Views |

modi q
 
दिल्ली : ( Modi Employment Drive ) देशातील तरुणांसाठी सध्या सुवर्णसंधीचा काळ आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 व्या रोजगार मेळाव्यात सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होत त्यांनी विविध सरकारी विभागांमध्ये 51,000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान केली. देशभरातील 47 ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन ( Modi Employment Drive ) करण्यात आले.
 
मोदींनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हवाला देत भारताच्या जलद आर्थिक वाढीचा उल्लेख केला. ऑटोमोबाईल आणि पादत्राणे उद्योगात झालेल्या वाढीमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. 2014 पूर्वीच्या तुलनेत अंतर्गत जलमार्गावरील मालवाहतूक आणि राष्ट्रीय जलमार्गांची संख्या लक्षणीय ( Modi Employment Drive ) वाढली आहे.
 
महिलांचा उल्लेखनीय सहभाग
 
पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांतील महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले. यंदाच्या यूपीएससी परीक्षेत पहिल्या पाच टॉपर्सपैकी तीन महिला असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, देशभरातील 90 लाख बचत गटांमध्ये 10 कोटींपेक्षा अधिक महिला कार्यरत आहेत.
 
मुंबईतील नवे जागतिक व्यासपीठ
 
मुंबईत होणाऱ्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषदेला (वेव्हज) तरुणांसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि इमर्सिव्ह मीडिया यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये तरुणांना नव्या संधी मिळतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.
 
9.22 लाख तरुणांना संधी
 
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा रोजगार मेळावा होता. याआधी 23 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या 14 व्या मेळाव्यात 71 हजार जणांना नोकरीच्या संधी मिळाल्या होत्या. आतापर्यंत एकूण 9.22 लाख तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे.