नागपूर : ( Bhosale Sword Auction ) भोसल्यांच्या अजरामर इतिहासाची जिवंत साक्ष म्हणजे भोसल्यांची तलवार. या तलवारी बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आहे. राजे रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी मराठा सरदार होते. त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणातील समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या. त्यांनी दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन 1745 ते 1755 दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.
इंग्लंड पर्यंतचा प्रवास
भारतातील काही ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी या तलवारीची मालकी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले ( Bhosale Sword Auction ) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल रोजी हा लिलाव होणार असून, दिल्लीतील काही उत्साही मंडळींनी इच्छा दर्शवल्याचे समजले. युरोपियन बनावटीचा सुरा, 124 सेमी लांबी, सोन्याने मढवलेली पाठ आणि हिरव्या लोकरीने विणलेली मूठ असलेली ही तलवार नागपूरकर राजे रघुजी भोसले यांनी वापरल्याचे लंडनच्या संग्रहालयाने जाहीर केले आहे. महाराष्ट्रात श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (दुसरे) उर्फ (अप्पासाहेब महाराज) च्या नेतृत्वाखाली 1853 ते 1865 दरम्यान मराठा विरुद्ध इंग्रज (ब्रिटिश) युद्ध झाले. त्याच कालखंडात इंग्रजांनी (ब्रिटिशांनी) नागपूरवर कब्जा मिळवला, हे सर्वज्ञात आहे. अनेक रत्नजडित शस्त्रे, शस्त्र सामग्री लुटून भारताबाहेर गेली. त्या लुटीत कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता राजे मुधोजी भोंसले यांनी व्यक्त केली.
संग्रहालयाची विशेषतः
सोथेबीजची स्थापना 1744 मध्ये झाली असून, कला आणि विलासी वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी जगातील एक प्रमुख ठिकाण आहे. उत्कृष्ट कला आणि विलासी वस्तूंपर्यंत पोहोचणे आणि त्यांची मालकी मिळवणे सोपे करते. जागतिक बाजारपेठ तंत्रज्ञानाच्या प्रगत प्रणालीवर आणि 40 देशांमधील 70 प्रकारच्या वस्तूंमधील तज्ञांच्या नेटवर्कवर आधारित असलेले हे दालन आधुनिक कला, प्रभाववादी कला, जुनी चित्रे, चीनी कलाकृती, दागिने, घड्याळे, वाईन आणि स्पिरिट्स, डिझाइन तसेच संग्रहणीय कार आणि स्थावर मालमत्तांचा लिलाव ( Bhosale Sword Auction ) करते.
तलवारीच मोल
युरोपियन शैलीत बनलेल्या तलवारीवर देवनागरी लिपीत 'नागपूरकर रघुजी भोसले सेनासाहेबसुभा' असे कोरण्यात आल्याने तलवारीचे आकर्षण वाढले आहे. जर्मनीतील सोलिंगेन आणि व्हेनिस आणि जेनोवासारख्या केंद्रांमध्ये बनवलेल्या युरोपियन ब्लेडने बसवलेल्या तलवारी फिरंगी (फ्रँकिश) म्हणून ओळखल्या जात. हाच 'फिरंगी' हा शब्दही तलवारीवर आढळून येतो. भारतीय दरबारात या तलवारींची मागणी होती, जहांगीरच्या खजिन्यात अशा 2200 तलवारी होत्या अशी नोंद 1608-13 पासून भारतात प्रवास करणा-या विल्यम हॉकिन्सने करवून ठेवली आहे. 14 फेब्रुवारी 1755 रोजी रघुजींचे निधन झाले, त्यामुळे ही तलवार जर खरोखरच राजे रघुजींनी वापरलेली असेल, तर ती किमान 300 वर्षे जुनी असली पाहिजे, असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. लिलावाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच इतिहास अभ्यासकांसोबत भोसले कुटुंबाची चिंता वाढली आहे. या तलवारीचा लिलाव करण्याचा निर्णय इंग्लंडच्या न्यूयॉर्क शहरातील सोथेबीज या जगप्रसिद्ध संग्रहालयाने ( Bhosale Sword Auction ) घेतला.