Pahalgam Attack Footage : गोळीबार सुरू होताच त्यांनी झाडावर चढून केले हल्ल्याचे रेकॉर्डिंग

( Pahalgam Attack Footage )

Top Trending News    28-Apr-2025
Total Views |

pah
 
श्रीनगर : ( Pahalgam Attack Footage ) पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्याच्या बाबतीत महत्वपूर्ण पुरावा मिळालेलं आहे. सुरुवातीला संशय होता त्याप्रमाणे हा अंदाधुंद गोळीबार नव्हता असे एनआयएचा म्हणणे आहे. दहशतवाद्यांनी ठरवून पर्यटकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या असे एजन्सीने सांगितले. सुरूवातीला दोन दहशतवाद्यांनी चार पर्यटकांच्या डोक्यात गोळी घातल्यानंतर गोंधळ सुरू झाला, असे तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी सांगितले. त्यानंतर इतर दोन दहशतवादी समोर आले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या लोकांच्या गर्दीवर गोळीबार सुरू केला. या संपूर्ण घटनेचा पुरावा आता आपल्याला पाहायला मिळणार ( Pahalgam Attack Footage ) आहे.
 
प्राथमिक तपासात, चार दहशतवादी हे दोन गटांमध्ये विभागले गेले होते आणि त्यांनी दोन बाजूंनी गोळीबार सुरू केला. दुकानाच्या मागे लपलेले दोन दहशतवादी दुपारी समोर आले. त्यांनी आधी बाहेरून आलेल्या लोकांना त्यांचा धर्म विचारला. काही जणांना कलमा वाचायला सांगितला, जे म्हणू शकले नाहीत त्यांना ठार केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
स्थानिक व्हिडीओ ग्राफरने केले हल्ल्याचे चित्रिकरण
 
पहलगामच्या बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे चित्रिकरण एका स्थानिक व्हिडीओग्राफरने ( Pahalgam Attack Footage ) केले आहे. हा स्थानिक फोटोग्राफर गोळीबार सुरू झाल्यानंतर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तेथून पळाला. गोळीबारापासून वाचण्यासाठी एका झाडावर चढला. पण, त्याने या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्ड सुरूच ठेवले. त्याने संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचे रेकॉर्डिंग केल्याचा दावा या वृत्तात केला आहे.
 
एनआयने या व्हिडीओग्राफरची चौकशी केली असून त्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओच्या ( Pahalgam Attack Footage ) विश्लेषनातून दहशतवाद्यांची आणि त्यांना मदत करणाऱ्या संभाव्य ओव्हरग्राउंड वर्कर्सची ओळख पटवली जात आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या एनआयएसाठी तो महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. गोळीबार सुरू होताच हा व्हिडीओग्राफर झाडावर चढला आणि त्याने संपूर्ण हल्ल्याचे चित्रिकरण केल्याचा दावा एका स्थानिक वृत्तात करण्यात आला आहे. तो तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या रिल्स बनवून देण्याचे काम करीत होता, असे समजते.
 
दोन मोबाईल लंपास
 
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एक पर्यटक आणि एका स्थानिकाचा मोबाईल फोन नेला आहे. यंत्रणांकडून हे दोन्ही फोन ट्रॅक करण्यात येत आहेत. परंतु, ते स्विच ऑफ येत आहेत. तसेच, दहशतवाद्यांकडे एके 47 व एम 4 रायफली होत्या. अफगाणिस्तान युद्ध संपल्यापासून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून एम 4 रायफलचा वापर सुरू असल्याने या हल्ल्यामागे कोण हे स्पष्ट होते.