Pakistani Visa Expiry : अटारी सीमेवर जमली गर्दी, पाकिस्तानींची व्हिसा मुदत संपली

Top Trending News    28-Apr-2025
Total Views |

visa
 
दिल्ली : ( Pakistani Visa Expiry )  गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, राज्य पोलीस आणि इमिग्रेशन विभागाने आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमृतसर, गुरुदासपूर आणि फिरोजपूर सारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने लोक सीमेकडे निघाले. कोणीही बेकायदेशीरपणे भारतात राहू नये. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रवेशद्वारावरील कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. आपल्या कुटुंबासह आलेले अनेक वृद्ध, महिला आणि मुले जड अंतःकरणाने भारत सोडण्याची तयारी करताना दिसले. त्यांच्या भारतीय नातेवाईकांना, मित्रांना आणि वर्षानुवर्षे त्यांनी बनवलेल्या नातेसंबंधांना निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले.
 
केंद्र सरकारच्या अलीकडेच दिलेल्या निर्देशांनुसार, 27 एप्रिल ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर अशा नागरिकांना भारत सोडणे बंधनकारक करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच अटारी-वाघा सीमेवर पाकिस्तानी नागरिक येण्यास सुरुवात झाली. भारतात राहणाऱ्या ज्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाची मुदत संपली ( Pakistani Visa Expiry ) आहे किंवा ज्यांची दीर्घकालीन व्हिसा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांच्यासाठी रविवार हा खूप महत्त्वाचा आणि भावनिक दिवस होता.
 
वैद्यकीय व्हिसा असणाऱ्यांना सूट
 
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार बरेच लोक त्यांची परतीची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. तेच पाकिस्तानी फक्त 29 एप्रिलपर्यंत भारतात राहू शकतात. असे असूनही, सीमेवर जमलेल्या लोकांची संख्या बरीच मोठी होती. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार बरेच लोक त्यांची परतीची प्रक्रिया ( Pakistani Visa Expiry ) पूर्ण करत आहेत.
 
काय आहे सीमा हैदरचे प्रकरण ?
 
सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील ए.पी. सिंह यांनी स्पष्ट म्हटले की, सीमा हैदरने भारतात येऊन लग्न केले तसेच येथील संस्कृती आणि सनातन धर्म पूर्णपणे स्वीकारला आहे. सीमा आता भारतीय नागरिक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परतणे शक्य नाही. सीमा ही एका भारतीय मुलाची आई आहे. तिचा नवरा भारतात असून ती इथे तिच्या सासरच्यांसोबत राहते. तिने हिंदू धर्म आणि हिंदू रीतिरिवाज स्वीकारले आहेत, त्यामुळे तिला पाकिस्तानात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत ( Pakistani Visa Expiry ) नाही.
 
वरिष्ठ वकील अश्विनी दुबे म्हणाले की, सीमाचा नागरिकत्व अर्ज राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. अशा अनेक प्रकरणांचा कायदेशीर आढावा अजूनही सुरू आहे. सीमा सारख्या प्रकरणांमध्ये सरकार तपासाच्या आधारे निर्णय घेते. सर्व प्रकरणांची चौकशी केल्यानंतरच, एखाद्या व्यक्तीला भारतात राहण्याची परवानगी द्यायची की त्याला हद्दपार करायचे हे ठरवले जाईल.