Shinde on Terror : दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर, उपमुख्यमंत्री शिंदे बरसले

Top Trending News    28-Apr-2025
Total Views |

cm d
 
 
बुलढाणा : ( Shinde on Terror ) बुलढाणा येथे शिवसेनच्यावतीने आयोजित आभार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिक आपल्या देशात परत जाण्याचा निर्वाणीचा त्यांनी दिला. आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक मदतीला धावून जातो. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटकांच्या मानसिक आधाराची गरज होती. त्यासाठीच आपण अस्वस्थ मनाने श्रीनगर गाठले. पर्यटकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी व्यवस्था केली. यातून ४५० पर्यटकांना परत आणले तर बुलढाण्यातील 51 पर्यटक सुखरुप घरी पोहोचले, असे उपमुख्यमंत्री शिंदे ( Shinde on Terror ) म्हणाले.
 
पहलगाम येथे झालेला हल्ला शत्रूने भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला होय. पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडून नामोनिशाण मिटवले पाहिजे, ही समस्त भारतीयांची भावना आहे. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी देश सज्ज असून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात झालीय. सर्व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे ( Shinde on Terror ) यांनी केले.
 
सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांनी जनाची नाही मनाची तरी ठेवावी. पर्यटकांच्या मृत्यूंमध्ये त्यांना राजकारण दिसते. कोविडमध्ये मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे पाहिले आणि आता पहलगाम हल्ल्याचे राजकारण करणारेही पाहिले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर केली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री असताना बुलढाणा जिल्ह्याला 1100 कोटींचा निधी दिला. विदर्भाचे महाद्वार असलेल्या बुलढाण्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मराठवाडा विदर्भातील सिंचन प्रकल्प सुरु केले. अडीच वर्ष आरोप करणारे आता एसंशि म्हणतात. एसंशी म्हणजे एसंशिअल अर्थात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी आणि लाडक्या ज्येष्ठांसाठी हा एकनाथ शिंदे आवश्यकच आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.