Declare Pakistan Terrorist State : पाकला दहशतवादी देश घोषित करण्याची जगात मागणी

Top Trending News    29-Apr-2025
Total Views |

terror state
 
पहलगाम दहशतवादी ( Declare Pakistan Terrorist State ) हल्ल्यातील बळींना आता जगभरातील अनेक शहरांमधून निदर्शना द्वारे सांत्वन मिळत आहे. दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो भारतीय-अमेरिकन ह्यूस्टनमध्ये जमले. त्यांच्या हातात फलक होते ज्यावर लिहिले होते, 'दहशतवादाचा एकच धर्म असतो.' निष्पाप लोकांना मारणे थांबवा. त्याचवेळी, दाऊदी बोहरा समुदायाचे लोक न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे जमले आणि बळींना श्रद्धांजली वाहून हल्ल्याचा निषेध केला.
 
फ्रान्समधील भारतीय स्थलांतरितांनी आयफेल टॉवरजवळील प्लेस डू ट्रोकाडेरो येथे निदर्शने केली. भारतीय समुदायाच्या सदस्यांनी हातात फलक घेऊन तिरंगा फडकावला आणि दहशतवादाविरुद्ध कडक निषेध दर्शविला. निदर्शकांनी पाकिस्तानवर दहशतवादी कारवायांना आश्रय आणि पाठिंबा दिल्याचा आरोप केला. आंतरराष्ट्रीय समुदायाला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. निदर्शकांनी फ्रान्स, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांना दहशतवादाला मदत करणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही ( Declare Pakistan Terrorist State ) यावेळी केले.
 
फ्रँकफर्टमध्ये भारतीय स्थलांतरितांनी निषेध मोर्चा काढला. फ्रँकफर्टमध्ये भारतीय स्थलांतरितांनी एक रॅली काढली. 300 हून अधिक भारतीय प्रवासी सहभागी झाले होते. दहशतवादाच्या बळींच्या कुटुंबांसोबत वेदना व्यक्त करत फ्रँकफर्टच्या प्रमुख मार्गांवरून मध्य रेल्वे स्थानकापासून डोम रोमरपर्यंत निषेध मोर्चा काढला. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 जणांच्या स्मरणार्थ, बर्लिनमधील गणेश हिंदू मंदिरात शांती होमाचे आयोजन करण्यात आले.
 
पाकला दहशतवादी देश घोषित करा
 
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हिंदूंच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी टोरंटोमधील कॅनडाच्या लोकांनी मेणबत्ती मार्च काढला. हिंदू फोरम कॅनडा आणि इतर अनेक हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात 500 हून अधिक हिंदू, यहुदी, बलुच, इराणी आणि इतर कॅनेडियन नागरिक उपस्थित होते. टोरंटोच्या रस्त्यांवर निदर्शकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत मोर्चा काढला. तर, कॅनडा सरकारने पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याचे ( Declare Pakistan Terrorist State ) आवाहन केले.