इस्लामाबाद : ( Turkey Betrays India ) पाकिस्तानविरुद्ध कारवाईचा दिल्ली वेगाने विचार करत आहे. त्यामुळे, तुर्की पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भेटीच्या अजेंड्यात प्रादेशिक सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण सहकार्य आणि गुप्तचर माहिती सामायिकरण यांचा समावेश असल्याचे म्हटल्या जात आहे. भारतासोबत युद्धाच्या भीतीने लेफ्टनंट जनरल यासर कादिओग्लू यांच्या नेतृत्वाखाली तुर्कीचे लष्करी शिष्टमंडळ इस्लामाबादला पोहोचले. भारत पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. अशा परिस्थितीत तुर्की लष्करी अधिकाऱ्यांचा पाकिस्तान ( Turkey Betrays India ) दौरा झाला आहे.
भारतीय आक्रमणाच्या भीतीने तुर्कीने इस्लामाबाद ( Turkey Betrays India ) सोबत आपला लष्करी सहभाग वाढविला आहे. लेफ्टनंट जनरल यासर काडिओग्लू यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय तुर्की लष्करी आणि गुप्तचर शिष्टमंडळाने इस्लामाबादमधील पाकिस्तान हवाई दलाच्या मुख्यालयाला धोरणात्मक पातळीवरील चर्चेसाठी भेट दिली आहे. पाकिस्तानला शस्त्रे पाठविल्याच्या वृत्तांना नकार देत तुर्कीने एक निवेदन जारी करून शस्त्रे पाठविल्याचे वृत्त खोटे, असल्याचे म्हटले होते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे तुर्कीचे विमान फक्त इंधन भरण्यासाठी कराचीत उतरले होते, असे वृत्त मिळाले आहे. तसेच, लष्करी हस्तांतरणाचे सर्व वृत्त खोटे असल्याचेही सांगितले जात आहे. यापूर्वी, तुर्कीने किमान 6 लष्करी विमानांमधून पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पोहोचवल्याची माहिती आली आहे. तथापि, तुर्की सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. पण तरीही शक्यता नाकारता येत नाहीत.
काय आहे वास्तव ?
तुर्कीचा हा दावाही खरा वाटतो कारण कराचीहून उड्डाण केल्यानंतर तुर्कीचे विमान भारतीय हवाई हद्द वापरून मलेशियाला पोहोचले. अशा परिस्थितीत, जर खरोखरच शस्त्रे पोहोचविण्याचा हेतू असता तर तुर्की विमानाने किमान भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला नसता. तरीही, वास्तव काय आहे, याची आम्ही पुष्टी करू शकणार नाही. पण, तुर्की लष्करी अधिकाऱ्यांचे इस्लामाबादमध्ये आगमन थोडे आश्चर्यकारक आहे. अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की युद्ध झाल्यास तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देऊ शकते. तुर्कीने पूर्वीही काश्मीरवर पाकिस्तानच्या बाजूने युक्तिवाद केला आहे. तथापि, भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.