देवरिया : ( Yogi Adityanath ) मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. समाजवादी पक्षाचे लोक याबाबत सर्व प्रकारची विधाने करत आहेत. कधीकधी हे विधान समाजवादी पक्षाच्या नेत्याने केले आहे की पाकिस्तानच्या प्रवक्त्याने केले आहे हे निश्चित करणे देखील कठीण होते, असा घणाघात त्यांनी केला आहे. या हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जेव्हा पत्रकारांनी सपा अध्यक्षांना विचारले की ते कानपूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या घरी जाणार का ? तेव्हा ते (सपा अध्यक्ष) सांगतात की ते आमच्या पक्षाचे नव्हते. त्यांनी म्हटले की हे किती लज्जास्पद विधान आहे, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री योगी ( Yogi Adityanath ) यांनी देवरियामध्ये 501 विकास योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. देवरियाला विकास प्रकल्पांची भेट दिल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभेला संबोधित करत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देवरियाच्या दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करत विरोधी समाजवादी पक्षावर (सपा) जोरदार हल्ला चढवला. देवरियामध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जातीच्या मुद्यावर सपावर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल करताना, “हे लोक जातीबद्दल बोलतात पण सत्तेत आल्यावर ते तुष्टीकरण धोरणाच्या मर्यादा ओलांडतात आणि फक्त त्यांच्या कुटुंबांच्या हिताबद्दल बोलतात.” असे म्हटले.