दिल्ली : ( Pakistan Conspiracy ) जम्मू एअरबेसवर हल्ला झाल्याचा दावाही पाकिस्तानने केला होता. जो पाकिस्तानने सोशल मीडियावर अपलोड केला आणि म्हटले होते की, जम्मू एअरबेसला लक्ष्य करण्यात आले होते. पाकिस्तानने गुजरात बंदर, जालंधर आणि जम्मू हवाई तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. ज्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
जालंधरमध्येही हल्ल्याचा खोटा दावा
भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान सोशल मीडियावर ( Pakistan Conspiracy ) खोटे दावे करत आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) त्यांच्या तथ्य तपासणीत पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पीआयबीने तथ्य तपासणीत आणखी एक बनावट व्हिडीओ शुक्रवारी सकाळी उघड केला. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात होता की, पाकिस्तानने पंजाबमधील जालंधरवर हल्ला केला आहे. तथ्य तपासणीनुसार, हा व्हिडीओ एका शेतात लागलेल्या आगीचा आहे. तर दुसऱ्या व्हिडिओ हा ऑगस्ट 2021 मध्ये काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटाचा व्हिडीओ होता.
पाकिस्तानने गुजरात बंदरात आग, जालंधरमध्ये ड्रोन हल्ला आणि जम्मू एअरबेसवर स्फोट झाल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओद्वारे दावा केला जात आहे की, पाकिस्तानने गुजरातमधील हजिरा बंदर आणि जालंधरवर ड्रोनने हल्ला केला. पीआयबी फॅक्ट चेकनुसार, हा व्हिडीओ 7 जुलै 2021 चा आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील हजिरा बंदराचा नाही तर एका तेल टँकरला लागलेल्या आगीचा आहे. पाकिस्तानने खोटी ( Pakistan Conspiracy ) बातमी पसरवण्यासाठी या जुन्या व्हिडीओचा वापर केला आहे.
राजस्थानच्या बाडमेर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, गंगानगर, हनुमानगड या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोन उडवण्यास पूर्णपणे बंदी आहे. परवानगीशिवाय ड्रोन ऑपरेशनवर बंदी असेल. सीमावर्ती भागात पाकिस्तानी हल्ल्यानंतर ( Pakistan Conspiracy ) कोटा जिल्ह्यातील संवेदनशील आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. रवींद्र गोस्वामी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले झाले आहेत. अशा परिस्थितीत, भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र, लष्करी छावणी क्षेत्र रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या भागात ड्रोन क्रियाकलापांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच, संपूर्ण जिल्ह्याला यलो झोन घोषित केले जाईल.