Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंनी दाखवले औदार्य, स्वीकारली ‘ति’च्या शिक्षणाची जबाबदारी

Top Trending News    13-May-2025
Total Views |

chadr
 
नागपूर : ( Chandrashekhar Bawankule ) राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात एक महिला डबडबल्या डोळ्यांनी दहावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला घेऊन त्यांना भेटली. दीपाली सावरकर तिचे नाव. मिस्तरी काम करणाऱ्या तिच्या पतीला अपघातात अपंगत्व आले. हाताचा रोजगार सुटला. पुन्हा उभारीसाठी तिच्या पतीने शासनाकडून ई-रिक्षा मिळावी, असे स्वप्न बाळगले होते.त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याने संघर्षाची ही बिजे घेऊन दीपाली सावरकर हीने आपल्या मुलीला जवळच्या नातलगाकडे शिक्षणासाठी पाठविले. पतीच्या ई-रिक्षाबाबत असलेल्या इच्छेला तिने आपले ध्येय बाळगून स्वयंरोजगाराचा मार्ग घेता येईल का यासाठी संघर्ष सुरू केला. यातच जनता दरबाराचा मार्ग तिला सुचविण्यात आला.
 
11 मे रोजी आपल्या संघर्षाची कहानी तिने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांना सांगितली. जनता दरबाराचे कामकाज संपले पण त्यांची अस्वस्थता संपली नाही. काही करता येईल का हा विचार करून त्यांनी तत्काळ ई-रिक्षाची मागणी नोंदविली. दुसऱ्याच दिवशी 12 मे रोजी त्यांनी दीपाली व दहावीत शिकणाऱ्या तिच्या हस्तीका या लेकीला निमंत्रित केले. धीर देऊन तातडीने मागविलेला ई-रिक्षा दीपालीच्या हवाली करताना तेही भारावले. स्वयंरोजगाराचे एक स्वप्न पूर्ण होताना गहिवरलेल्या मायलेकीकडे उपस्थितही साक्षीदार होताना भारावले नसतील तर नवलच. रिक्षा पाठोपाठ हस्तीकाच्या शिक्षणाचीही जबाबदारी त्यांनी घेतली.