Gadchiroli Naxal Operation : गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, कवडे जंगलात स्फोटकांसह शस्त्रसाठा जप्त

Top Trending News    13-May-2025
Total Views |

naxal 1
 
गडचिरोली : ( Gadchiroli Naxal Operation ) भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गाव जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात गडचिरोली जिल्हा पोलिस दलाला सोमवारी सकाळच्या सुमारास यश मिळविले आहे. दरम्यान नक्षल्यांशी तब्बल 2 तास उडालेल्या चकमकीत काही नक्षली ठार किंवा जखमी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळावरुन स्फोटकासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
 
नक्षल्यांचा गड ( Gadchiroli Naxal Operation ) समजल्या जाणाऱ्या छत्तीसगड सीमेलगत भामरागड तालुक्यातील कवंडे गावात काही महिन्यांपूर्वीच पोलिस ठाणे उभारण्यात आले होते. 11 मे रोजी काही नक्षली कवंड जंगलात तळ ठोकून असल्यची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे सी-60 पथकाच्या 200 जवानांद्वारे जंगलात अभियान राबविण्यात आले. रविवारी, सकाळच्या सुमारास नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला यास जवानांनी जोरदार प्रतित्यूर दिले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी 2 तास चाललेल्या चकमकीनंतर नक्षल्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर ठिकाणी शोधमोहीम राबविली असताना स्फोटकासह मोठ्या प्रमाणात शस्त्रासाठा जप्त करण्यात आला.
 
त्यामध्ये एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल,एक मॅगझीन,अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू सापडल्या आहेत. घटनास्थळाच्या पाहणीवरुन चकमकीत काही नक्षली ठार किंवा जखमी झाल्याची शक्यता ( Gadchiroli Naxal Operation ) वर्तविण्यात येत आहे. छत्तीसगड सीमेवर नक्षल्यांचा तळ उध्वस्त करण्यात आल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.