India Pakistan War Alert : फक्त 17 दिवस शिल्लक ! पुन्हा हल्ला होणार, पाकिस्तानी नेत्याचा खळबळजनक दावा

Top Trending News    15-May-2025
Total Views |

pakistani le
 
इस्लामाबाद : ( India Pakistan War Alert ) ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानी हल्ल्यांना इतके चोख प्रत्युत्तर दिले आहे की, पाकिस्तानला त्याचे दुःख विसरता आले नाही. पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या हल्ल्याची भीती ही नेहमीच असते. त्याचवेळी, पाकिस्तानी नेत्यांना भारताकडून आणखी हल्ल्यांची भीती वाटू लागली आहे. युद्धबंदीनंतरही पाकिस्तानी नेते म्हणत आहेत की भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करेल. अशा विधानांवरून हे समजते की युद्धबंदीनंतरही पाकिस्तानमध्ये भारताची भीती कायम आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तान दोन आठवडे भीतीच्या छायेत राहिला आणि 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून ही भीती प्रत्यक्षात आणली. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त ( India Pakistan War Alert ) केले. त्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
 
पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानची अनेक शहरे हादरवली. पाकिस्तान आणि भारत यांच्यात आता युद्धबंदी असली तरी, भारताची भीती पाकिस्तानमध्ये खोलवर रुजलेली आहे. तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पाकिस्तानने ( India Pakistan War Alert ) सतर्क आणि सावध राहिले पाहिजे.
 
एका टीव्ही कार्यक्रमात अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक म्हणाले की, मे महिना हा एक महत्त्वाचा महिना असेल, विशेषतः पुढील 17 दिवस, कारण युद्धबंदी जाहीर करूनही तणाव जास्त आहे. 17 दिवसांत भारत पुन्हा पाकिस्तानचा तणाव वाढवू शकतो आणि हल्ला करू शकतो, युद्ध अजून संपलेले नाही, असे ते म्हणाले. एका टप्प्यावर, मलिक यांनी पाकिस्तानी सैन्याच्या प्रचाराचा पुनरुच्चार केला की, पाकिस्तानने लढाईत पाचपेक्षा जास्त भारतीय विमाने पाडली आहेत. अजूनही युद्ध संपलेले नाही, फक्त युद्धबंदी लागू आहे यावर भर दिला. पाकिस्तानात अजूनही भीती वातावरण आहे.