Shiv Sena Split : शहांचा खुलासा की कारस्थान ? शिवसेना फुटी मागचं रहस्य उघड

Top Trending News    15-May-2025
Total Views |

shivsena
 
मुंबई : ( Shiv Sena Split ) भारत पाकिस्तानदरम्यान युद्धबंदीची घोषणा झाल्यापासून शिवसेने (उबाठा) चे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत. महापालिका आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या तयारी संदर्भात बुधवारी नाशिकमध्ये शिवसेने (उबाठा) ची बैठक झाली. या बैठकीसाठी संजय राऊत नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांशी ( Shiv Sena Split ) चर्चा केली. या प्रसंगी राऊत यांनी शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेसोबत युती, महापालिका निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर उघडपणे विचार मांडले.
 
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा ( Shiv Sena Split ) आरोप करून अमित शहांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पण, यावेळी राऊत यांच्या बोलण्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपा खासदार नारायण राणे यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर दिसून आला. संजय राऊत म्हणाले, अमित शहांच्या संमतीनेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हिसकावून घेतली तर अजित पवारांनी राष्ट्रवादी हिसकावून घेतली. पण या बाबतीत मी नेहमीच राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे कौतुक करतो. त्यांनी कोणाचाही पक्ष चोरला नाही. राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. जरी ते पक्ष चालवू शकले नाहीत आणि नंतर दुसऱ्या पक्षात सामील झाले. पण त्यांनी कधीही शिवसेनेवर दावा केला ( Shiv Sena Split ) नाही. त्याचप्रमाणे राज यांनीही स्वतःचा पक्ष स्थापन केला. अजित पवार, एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात हाच फरक आहे.
 
गैर संबंधांना पूर्णविराम द्या
 
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे स्वागत तर अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येण्यास विरोध करण्याच्या त्यांच्या दुहेरी धोरणाबद्दल विचारले असता, राऊत म्हणाले, राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ आहे. जिथे कोणीही जाऊन पदवी मिळवू शकते. पण त्यांच्या विषयी आम्हाला अपेक्षा असा आहे, आमच्यासोबत आल्यानंतर त्यांना अनैतिक संबंध म्हणजेच भाजपा-शिवसेना (शिंदे गट) नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध संपवावेत, अशा शब्दांत राऊत यांनी राज आणि उदय सामंत यांच्यातील भेटीवर आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत, सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित महाराष्ट्रात राहतील, असे त्यांनी सांगितले. हे सूत्र आधीच ठरलेले होते. पण अजित पवारांनी शहांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ( Shiv Sena Split ). मात्र, मूळ राष्ट्रवादी शरद पवार यांची आहे. तसेच मूळ शिवसेनाही उद्धव ठाकरेंची आहे, असा दावाही त्यांनी केला.
 
निवडणूक आयोगावर निशाणा
 
संजय राऊतांना चार महिन्यांत नागरी निवडणुका घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत विचारले असता, महाविकास आघाडी पुन्हा एकत्रपणे निवडणुका लढवेल. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत पण भाजपाची नागरी निवडणुकांची तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही. निवडणूक आयोगाची ईव्हीएमची तयारीही अपूर्णच आहे. भाजपा आणि निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.