RSS Attack Mastermind : RSS च्या मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईडचा पाकिस्तानात खात्मा

Top Trending News    18-May-2025
Total Views |
 

p
 
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ( RSS Attack Mastermind ) स्थापना जेथे झाली त्या महाल परिसरातील ‘मोहिते वाडा’ या संघ मुख्यालयावर 2006 साली दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पोलिसांच्या वर्दीत मुख्यालयाच्या दिशेने कुच करून आलेल्या दशहतवाद्यांना संरक्षण दलाने यमसदनी धाडले. महत्त्वाचे म्हणजे शहर पोलिसांची सतर्कता आणि साहस हा हल्ला परतवून लावण्यासाठी मोलाचे ठरले आहे. या हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार पाकिस्तानातील सिंध प्रांतात मारला गेल्याचे वृत्त आहे.
 
सैफुल्ला उर्फ विनोद कुमार उर्फ मोहम्मद सलीम उर्फ खालिद उर्फ वानियाल उर्फ वाजिद उर्फ सलीम भाई असे या दहशतवादीचे नाव असून तो लष्कर-ए-तैयबा (एलईटी) संघटनेचा एक प्रमुख दहशतवादी होता. आज सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली तालुक्यात त्याला गोळ्या घालण्यात आल्या. ( RSS Attack Mastermind )
 
नेपाळमध्ये दहशतवादी संघटनेच्या संचालनाची मूळ जवाबदारी असलेल्या सैफुल्ला याला प्रामुख्याने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवण्याचे काम सोपवण्यात आले होते. तो बराच काळ नेपाळमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कारवाया हाताळत होता. वृत्तानुसार, तो नेपाळमार्गे लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना भारतात घुसवत असे. सैफुल्ला हा दहशतवादी संघटनेचा ऑपरेशनल कमांडर आझम चीमा उर्फ बाबाजीचा जवळचा सहकारी होता. तो विनोद कुमार या नावाने नेपाळमध्ये कार्यरत होता आणि त्याने नगमा बानू नावाच्या नेपाळी मुलीशी लग्नही ( RSS Attack Mastermind ) केले होते. 
 
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबासाठी दहशतवाद्यांची भरती करण्याची प्रमुख जवाबदारी तो माटली येथून बजावत होता. तसेच नेपाळमधून दहशतवादी संघटनांची भरती, निधी, रसद आणि भारत-नेपाळ सीमेवरील कारवायांमध्येही त्याचा हात असल्याचे बोलल्या जाते आहे. 2006 संघ मुख्यालयाच्या हल्ल्यात त्याचा सहभागी महत्त्वाचा धरण्यात आला. शिवाय रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयआयएससी बेंगळुरूवरील हल्ल्याच्या कटातही तो सहभागी होता असे बोलल्या जाते.