वेलिंग्टन : ( Baby Naming Law ) न्यूझीलंडमध्ये काही विशिष्ट नावांवर मुलामुलींची नावे ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या मध्ये किंग उर्फ राजा या नावाचा समावेश आहे. शाही पदाशी संबंधित किंग, प्रिन्स या नावांवर तिथे गेली अनेक वर्षे बंदी आहे. नाव नोंदणी कायद्यानुसार ड्यूक, मॅजेस्टी, एम्परर या नावानांही बंदी आहे. अमेरिकेत मात्र उलट आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी एक हजाराहून अधिक बाळांची नावे ‘किंग’ ठेवण्यात आली आहे. न्यूझीलंडने गेल्या वर्षी 60 हजार बाळांच्या जन्मांची ( Baby Naming Law ) नोंदणी केली. त्यातील 38 प्रस्तावित नावे नाकारली. न्यूझीलंडच्या कायद्यानुसार, बाळांची नावे आक्षेपार्ह, अवास्तव लांब किंवा संख्या आणि चिन्हे समाविष्ट नसावीत.
न्यूझीलंडमध्ये ‘किंग’ नाव ठेवण्यास बंद असली तरी काही पालकांच्या हे लक्षात येत नाही. ते आपल्या बाळाचे नाव किंग ठेवतात. मात्र सरकारकडून असे अर्ज फेटाळले जातात. सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशननुसार, 2024 मध्ये अमेरिकेत 1,000 हून अधिक मुलांना किंग असे नाव देण्यात आले. न्यूझीलंडने नाकारलेली बहुसंख्य नावे राजेशाहीची संबंधित होती. प्रिन्स नावाचे अर्ज नाकारण्यात आले. तसेच किंगी, किंग्झ, प्रिन्सेस आणि रॉयल्टी यासारख्या नावांवर देखील बंदी आहे.