Lufthansa Airlines : पायलट बेशुद्ध ! 10 मिनिटे आकाशात भटकत राहिले विमान, 200 प्रवासी धोक्यात

Top Trending News    19-May-2025
Total Views |

flight
 
बर्लिन : ( Lufthansa Airlines ) जर्मन वृत्तसंस्था डीपीएने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, कॉकपिटमध्ये असलेला एकमेव को-पायलट बेशुद्ध पडल्यानंतर 10 मिनिटे विमान पायलट शिवाय हवेतच होते. हे विमान लुफ्थांसा एअरलाईन्सचे असून एक विमान तब्बल 10 मिनिटे पायलट शिवाय हवेतच असल्याचा धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 199 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते. तब्बल 10 मिनिटे विमान पायलट शिवाय उड्डाण करत होते. सदर अहवाल बाहेर आल्यानंतर लुफ्थांसा एअरलाईन्सची प्रतिक्रिया ( Lufthansa Airlines ) समोर आली आहे.
 
17 फेब्रुवारी 2024 रोजी फ्रँकफर्टहून स्पेनमधील सेव्हिल येथे जाणाऱ्या एअरबस ए 321 चा मुख्य कॅप्टन शौचालयात गेला होता. त्यावेळी कॉकपिटमध्ये असलेला को-पायलट अचानक बेशुद्ध पडला, असा अहवाल स्पॅनिश अपघात तपास प्राधिकरणने दिल्याचे वृत्त डीपीएने दिले आहे. ही घटना 2024 साली घडली असून त्याबद्दलचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. या अहवालाची आपल्याला कल्पना असून कंपनीच्या उड्डाण सुरक्षा विभागाने अंतर्गत चौकशी केली असल्याचे लुफ्थांसाच्या वतीने सांगण्यात आले. तरी त्यांनी त्यांचा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही.