Ram Mandir : पहिल्या सोन्याच्या दरवाजाने उघडला भव्य अध्याय !

Top Trending News    02-May-2025
Total Views |

ram
 
अयोध्या - ( Ram Mandir ) भारतीय सीमा सुरक्षा दलाचे निवृत्त महासंचालक के. के. शर्मा यांच्या सौजन्याने या मूर्ती बसविण्यात आली आहे. सप्त मंडपात महर्षी अगस्त्य यांची मूर्ती स्थापित करण्यात आली. त्याची पूजा पूर्ण झाली. या पूजेमध्ये महर्षी अगस्तांच्या १०८ नावांचा पाठ करणे आणि आदित्य हृदय स्तोत्र द्वारे महर्षींची स्तुती करणे समाविष्ट होते. पुढील १० दिवसांत सर्व सात मंडप पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ईशान्य कोपऱ्यात असलेल्या शिव मंदिरावर आणि नैऋत्य कोपऱ्यात असलेल्या सूर्य भगवान मंदिरावर कलश स्थापित करण्यात आले. मंदिराचे शिखर पूर्ण झाले आहे. पूर्ण कलश स्थापित करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात ( Ram Mandir ) कलश पूजन समारंभ आयोजित केला होता.
 
सोन्याचा दरवाजा
 
अयोध्येच्या राम मंदिराच्या ( Ram Mandir ) बांधकामाला वेग आला असून, पहिल्या मजल्यावर राम दरबाराचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांच्या मते दरबाराचा पहिला सोन्याचा दरवाजा बसवण्याचे काम सुरू झाले असून, याव्यतिरिक्त, मंदिराचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल. मंदिराचे शिखर तसे पूर्ण झाले आहे. चंपत राय यांच्या मते, मंदिराचे सर्व सातही मंडप एप्रिलच्या अखेरीस जवळपास पूर्ण झाले आहेत. तर विशेष म्हणजे राम दरबाराच्या मूर्ती मंदिरात पोहोचल्या आहे.
 
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस सांगतात की, दरबाराच्या ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव मंदिर बांधले जात आहे. तर नैऋत्य कोपऱ्यात सूर्यदेवाचे मंदिर आहे. एप्रिल महिन्याच्या पुढील १० दिवसांत सर्व सात मंडप पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सर्व मूर्तीही आल्या आहेत. पूर्ण करण्याचे लक्ष्य ऑक्टोबर २०२५ आहे.