Cross Border Espionage : भारताविरुद्ध दुहेरी हेरयुद्ध ! चीन आणि पाकिस्तानच्या युतीचा भेद उघड

Top Trending News    20-May-2025
Total Views |

china in
 
ब्लूमबर्ग : ( Cross Border Espionage ) ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभूत करून त्यांना चांगलच हादरवल आहे. याच दरम्यान एक महत्वपूर्ण आणि धक्कादायक अहवाल समोर आला आहे. लष्कराने केवळ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले नाहीत तर अचूक हल्ल्यांमध्ये अनेक मोठ्या दहशतवाद्यांना ठार मारले. याशिवाय, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर आणि त्यानंतर सुरू झालेल्या संघर्षानंतर 15 दिवसांच्या आत चीनने पाकिस्तानच्या उपग्रह देखरेख यंत्रणेला भारतावर चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत ( Cross Border Espionage ) केली.
 
भारताच्या लष्करी तैनातीवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने पाकिस्तानला त्यांच्या हवाई संरक्षण आणि रडार प्रणालींची पुनर्रचना करण्यास मदत केली. उपग्रह डेटादेखील सामायिक ( Cross Border Espionage ) करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या 'सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज' या थिंक टँकच्या या अहवालात दोन मोठे खुलासे झाले आहेत. दोन अणुशक्ती असलेल्या देशांमधील संघर्षाची आग थंडावली आहे. आता तिसऱ्या पक्षाच्या म्हणजेच चीनच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अहवालातील खुलासे सांगतात की, चीनने पाकिस्तानला जिंकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु, भारतीय सैन्याच्या ताकदीसमोर टिकू शकले नाही. ज्यामध्ये म्हटले आहे की युद्धादरम्यान चीनने पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी केली होती.
 
पाणी युद्धात चीनची एन्ट्री
 
भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाण्याबाबत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान, चीनने म्हटले की, ते खैबर पख्तूनख्वा प्रांतात बांधले जाणारे धरण लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत. हे धरण स्वात नदीवरील मोहमंद जलविद्युत प्रकल्पासाठी बांधले जात आहे. चीनची सरकारी मालकीची कंपनी चायना एनर्जी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन 2019 पासून खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मोहमंद जलविद्युत प्रकल्पावर काम करत आहे. हा प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होणार असून पाण्याच्या कमतरतेमुळे पाकिस्तान या प्रकल्पाचे काम पुढे नेण्यासाठी चीनसोबत घाईघाईने काम करत आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मोहमंद धरणाचा वापर वीज निर्मिती, पूर नियंत्रण, सिंचन आणि पाणी पुरवठ्यासाठी केला जाईल.