China Marriage Alert : चीनमध्ये वधूंचा तुटवडा ! बांगलादेशी महिलांशी लग्न केल्यास मोठी फसवणूक

Top Trending News    27-May-2025
Total Views |

china m
 
ढाका : ( China Marriage Alert ) सध्या चीन मध्ये लग्नासाठी मुलींचा तुटवडा जाणवत आहे. मोठ्या संख्येने चिनी तरुण वधूच्या शोधात गरीब दक्षिण आशियाई देशांमध्ये जाता आहेत. चीनच्या दीर्घकालीन एक मूल धोरणामुळे आणि मुलांना प्राधान्य दिल्यामुळे लिंग असमतोलाचा सामना करत आहे. असा अंदाज आहे की 3 कोटी चिनी पुरुषांना जोडीदार सापडत नाही. यामुळे परदेशी वधूंची मागणी वाढली आहे. बांगलादेशातील चिनी दूतावासाने रविवारी रात्री उशिरा एक नोटीस जारी केली. ज्यामध्ये, चिनी नागरिकांनी परदेशात लग्नाबाबत संबंधित काही सूचना दिल्या होत्या. एकीकडे शेख हसीना यांच्यापासून चीन बांगलादेशशी आपले संबंध मजबूत करत आहे. परंतु, अलिकडेच चिनी दूतावासाच्या एक नोटीसीने खळबळ माजली ( China Marriage Alert ) आहे.
 
चिनी दूतावासाने एक नोटीस जारी केली ज्यात चिनी नागरिकांना बांगलादेशातील महिलांशी संबंध ठेवण्यापासून किंवा लग्न करण्यापासून रोखण्याचा इशारा दिला आहे. कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे, बेकायदेशीर मॅच मेकिंग एजंट्सपासून दूर राहावे आणि लघु व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरील सीमापार डेटिंग सामग्रीमुळे दिशाभूल होऊ नये, असे म्हटले आहे. दूतावासाचे म्हणणे आहे की त्यांनी परदेशी पत्नी खरेदी करण्याचा विचार नाकारावा आणि बांगलादेशात लग्न करण्यापूर्वी दोनदा विचार करावा, असा इशाराच नागरिकांना देण्यात आला ( China Marriage Alert ) आहे.
 
चीनमध्ये वधू तस्करीबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे इशारे देण्यात आले आहेत. एका अहवालात कथित लग्नाच्या बहाण्याने चीनमध्ये बांगलादेशी महिलांची विक्री केल्याच्या घटनांचा उल्लेख आहे. देशांमध्ये चिनी तरुणांना वधू पुरवण्यासाठी एक संपूर्ण नेटवर्क काम करते, ज्यामुळे एक मोठा बेकायदेशीर व्यवसाय पसरला आहे. यामध्ये मुलींना अडकवून चिनी नागरिकांशी लग्न लावले जाते. नंतर या महिलांना चीनमध्ये नेले जाते, अशी अनेक प्रकरणे भूतकाळात उघडकीस आली आहेत.