नागपूर : ( Cross Border Escape ) नागपूरची सुनीता कारगिलची एलओसीची सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुनीता पाकिस्तानात का गेली ? त्यामागे काही योजना तर नाही ना ! की कुठला कट उघडकीस येतो आहे. या सर्व बाबींचा विचार केला जात आहे. सुनीता कपिलनगर ठाण्यांतर्गत संत कबीरनगरात राहतात. 4 मे रोजी सुनीता आपल्या 13 वर्षांच्या मुलाला घेऊन घरातून निघाल्या. कुटुंबीयांना त्यांनी न्यायालयीन कामासाठी अमृतसरला जात असल्याचे सांगितले होते. मात्र, आश्चयाची बाबा म्हणजे अमृतसरला न जाता 9 मे रोजी त्या चक्क कारगिलला पोहोचल्या. सीमेलगत असलेल्या हुंदरमान गावातील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यानंतर, तेथून 14 मे रोजी अचानक बेपत्ता झाल्या, मात्र त्यांचा मुलगा हॉटेलमध्येच होता. कारगिलच्या एलओसीची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे यांना परत आणण्यासाठी शहर पोलिसांचे पथक अमृतसरला पोहोचले आहे. सुनीतासोबत त्यांच्या मुलालाही नागपुरात परत आणण्यात ( Cross Border Escape ) येणार आहे.
जेव्हा सुनीताचा शोध लागत नव्हता तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्यांच्या १३ वर्षीय मुलाला पोलिस संरक्षणात ठेवले. नंतर, तपासात पुढे आले की, सुनीला एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेल्या होत्या आणि त्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलाने पकडले होते. शनिवारी पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांनी त्यांना अटारी बॉर्डर येथे बीएसएफच्या स्वाधिन केले. बीएसएफने प्राथमिक चौकशीनंतर सुनीताला अमृतसर पोलिसांच्या स्वाधिन केले. अमृतसर पोलिसांनी शून्य अन्वये प्रकरण नोंदविले. सुनीता कपिलनगरच्या कबीरनगर परिसरात राहात असल्याने त्यांना कपिलनगर पोलिसांच्या स्वाधिन ( Cross Border Escape ) केले जाईल.
पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुनीताला ताब्यात घेण्यासाठी एक अधिकारी आणि 2 महिला पोलिस अमृतसरला रवाना झाल्या आहेत. नागपूरला आणल्यानंतर सुनीताची चौकशी केली जाईल. ती हेरगिरी किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होती किंवा नाही हे आम्हाला पडताळून पाहू. तर या प्रकरणात आणखी एका बाबा पुढे अली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी सुनीता पाकिस्तानी नागरिक जुल्फिकार आणि एका पास्टरच्या संपर्कात होत्या. त्यांनाच भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेली होती का ? या शंकेने सर्वांच्या मनात शंका निर्माण होत आहे. आपल्या बिमारीच्या नावाखाली वेगळाच कट तर रचला जात नाही ना ? या प्रश्नाचे उत्तर आता शोधायचे ( Cross Border Escape ) आहे.
सुनीताच्या मुलालाही लवकरच नागपूरला परत आणण्यात येणार आहे. सुनीता बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्याला कारगिलच्या बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) च्या देखरेखीत ठेवले होते. सुनीता नागपूरच्या एका रुग्णालयात काम करीत होत्या. सोबतच घरोघरी जाऊन कपडे विकत होत्या. सुनीताच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, तिच्या घटस्फोटापासून ती मानसिक तणावात होती. मानसिकरित्या आजारी असल्याने कोराडी येथील मनोरुग्णालयात तिच्यावर उपचारही सुरू होते. उपचाराशी संबंधित कागदपत्रेही कुटुंबीयांनी पोलिसांना ( Cross Border Escape ) दिले आहेत.