PM Sacred Sindoor Tree : सिंदुराचं झाड इतकं खास का आहे ? जे मोदी स्वतः घरी लावणार, काय आहे यामागचं रहस्य ?

Top Trending News    28-May-2025
Total Views |

sindoor
 
अहमदाबाद : ( PM Sacred Sindoor Tree ) 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पंतप्रधान मोदी गुजरातला पहिल्यांदाच भेटीवर आले. मोदींना कच्छमधील 1971 च्या युद्धातील शूर महिलांनी सिंदूरचा रोप भेट म्हणून दिले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. इंटरनेटवर, सिंदूर वनस्पती म्हणजेच कुमकुम झाडाची किंमत 190 रुपयांपासून 599 रुपयांपर्यंत दिसते. कच्छमध्ये पंतप्रधान मोदींना सिंदूर रोप दिल्यानंतर इंटरनेटवर त्याचा शोध वाढला आहे. सिंदूर वनस्पतीला कॅमेलिया ट्री किंवा कुंकूचे झाड असेही म्हणतात. हे झाड दक्षिण अमेरिका आणि काही आशियाई देशांमध्ये ( PM Sacred Sindoor Tree ) आढळते.
 
मोदींनी सिंदूरच्या झाडाचे दिल्लीतील लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी हे रोप लावण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 1971 च्या युद्धात महिलांनी फक्त 72 तासांत भूज एअरबेसची धावपट्टी दुरुस्त केली होती. मलाही त्या महिलांचा आशीर्वाद मिळाला आहे, असे पंतप्रधान मोदी ( PM Sacred Sindoor Tree ) म्हणाले.
 
सिंदूरचे महत्व
 
भारतातील महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात ते दिसून येते. या वनस्पतीच्या फळापासून सिंदूरसारखा लाल रंग बनवला जातो. हा दोन स्वरूपात म्हणजेच पावडर आणि द्रव स्वरूपात उपलब्ध असतो. या वनस्पतीचे वनस्पतिशास्त्रीय नाव बिक्सा ओरेलाना आहे. याला सिंदूरी, कपिला, कमिला, मल्लोटस, फिलीपिन्स या नावांनीही ओळखले जाते हे विशेष. या वनस्पतीच्या फळांपासून मिळणाऱ्या बिया बारीक करून नैसर्गिक सिंदूर बनवले जाते, म्हणून याला सिंदूर या नावाने ओळखले जाते.