दिल्ली : ( Starship Mars Mission ) एलॉन मस्कची स्पेसएक्स ही खासगी अंतराळ कंपनी आहे. ही कंपनी परवडणाऱ्या आणि पुनर्वापरयोग्य रॉकेट्सला मंगळावर मानवी वसाहत बसवण्याच्या दिशेने काम करत आहे. मस्कची अंतराळ कंपनी स्पेसएक्स पुढील वर्षीपर्यंत मंगळ मोहिमेसाठी त्यांचे शक्तिशाली नवीन रॉकेट स्टारशिप तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी सर्व तांत्रिक आव्हाने सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
गेल्या काही महिन्यांत अनेक कर्मचाऱ्यांना स्टारशिप प्रकल्पात हलविण्यात आले आहे. कंपनीने टेक्सासमध्ये स्टारशिपसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये मे महिन्याच्या मध्यात पुन्हा नियुक्त केलेल्या काही ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मस्क आणि इतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्टारशिप तेवढी सक्षम आहे. हे लवकर सिद्ध करण्यासाठी कंपनीवर फार ( Starship Mars Mission ) दबाव आहे.
नासाच्या 2027 च्या चंद्र मोहिमेसाठी स्टारशिपची आवृत्ती विकसित करण्याचे काम वेळापत्रकापेक्षा मागे आहे. या वर्षी स्टारशिपच्या सलग दोन चाचणी उड्डाणांचा स्फोट झाला. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी अलिकडच्या अपयशाला समजून घेण्यासाठी व्यापक चाचण्या केल्या आहेत. पुढील उड्डाणासाठी आवश्यक बदल ( Starship Mars Mission ) केले आहेत.
मोहिमेतील आव्हाने
सर्वात मोठ्या तांत्रिक अडथळ्यांपैकी एक म्हणजे अंतराळात इंधन भरणे. सामान्यतः रॉकेट आणि अंतराळयान जमिनीवरून पूर्णपणे इंधन भरून उड्डाण करतात. परंतु, स्पेस एक्सने अंतराळात तीन वेळा इंधन भरल्यानंतर स्टारशिप मंगळावर पाठवण्याची योजना आखल्याचे समजते आहे. अंतराळात इंधन हस्तांतरण आतापर्यंत कधीही या अशा प्रकारे केले गेले नाही. स्पेसएक्सने कक्षेत असलेल्या दोन वाहनांमध्ये इंधन हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. एक मोठे आव्हान म्हणजे बूस्टर अत्यंत कमी तापमानात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते बाष्पीभवन होऊ शकते.