Disabled Protest In Rain : दिव्यांगांचा आक्रोश ! उमरखेडमध्ये पावसात लोटांगण आंदोलन, प्रशासन गप्पच !

Top Trending News    29-May-2025
Total Views |
 

umred 
 उमरखेड : ( Disabled Protest In Rain ) उमरखेड शहरातील जवळपास सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनात सदर निधीच्या मागणीसाठी बैठका पार पडल्या. परंतु, मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांगांचा निधी दिव्यांग धोरण 2018 नुसार अद्यापही वाटप केला नाही. त्यामुळे संतप्त झालेले प्रहारचे कार्यकर्ते व दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी संजय गांधी चौक ते नगर परिषद कार्यालयापर्यंत लोटांगण घालत आंदोलन केले आहे. यावेळी त्यांनी आमचा निधी आम्हाला देण्याची हाक दिव्यांग बांधवांनी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे केली.
 
राज्याच्या दिव्यांग धोरण अंदाजपत्रकाच्या उपायोग विनियोगनुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निधीमधून कमीत कमी पाच टक्के इतका निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवला जातो. त्यानुसार 2018 पासूनचा नगर परिषदेने आपल्या उत्पादनाच्या पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खर्चित करावा, अशी तरतूद दिव्यांग धोरण 2018 मधील परिपत्रकात करण्यात आली आहे. सन 2018 ते 2025 पर्यंत दिव्यांग बांधवांचा हक्काचा 5 टक्के निधी हा दिव्यांग धोरण 2018 नुसार नगरपरिषदेच्या स्व उत्पन्नाच्या पाच टक्के वितरित करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्यावतीने नगर परिषदेच्या विरोधात चालू असणाऱ्या मुसळधार पावसामध्ये सलग चार तास लोटांगण घालत आंदोलन ( Disabled Protest In Rain ) करण्यात आले.
 
मुख्याधिकाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी उशीर लागत असल्याने आंदोलनकर्ते राहुल मोहितवार यांची तब्येत बिघडत असल्याने आंदोलक आक्रमक झाले. नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीवर चढले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपरिषद कार्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढल्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. त्या शासनाच्या परिपत्रका विरोधात नगर परिषद मुख्याधिकारी हे चुकीच्या पद्धतीने नियम लावून दिव्यांगांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. त्यामुळे, अशा मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून 2018 ते आजपर्यंतचा दिव्यांग निधी त्वरित वाटप करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे शहर प्रमुख राहुल मोहितवार ( Disabled Protest In Rain ) यांनी दिला.
 
निधी दिव्यांग धोरण 2018 नुसार मिळण्यासाठी गेल्या चार वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अनेक आंदोलनाच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाकडे विनवणी करण्यात आली. आंदोलनाची दखल नगर परिषदेकडून घेण्यात आली नाही. तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे ( Disabled Protest In Rain ) घेण्यात आले. शहर प्रमुख राहुल मोहितवार, तालुका प्रमुख सय्यद माजिद, तालुकाप्रमुख रवी जाधव, तालुका प्रमुख प्रदीप आडे, शहर सचिव शाम चेके, प्रजेश खंदारे,रघुनाथ खंदारे, प्रेम रुडे, इरफान, वैध, नेमीचंद चव्हाण आदी उपस्थित होते.