Khadse Andhare Vs Fuke : खडसे-अंधारे यांचे आरोप... फुके यांचं स्फोटक प्रत्युत्तर ! राजकीय वादाचा नवा अध्याय

Top Trending News    29-May-2025
Total Views |

khadase
 
डॉ. रमा रमेश फुके ( Khadse Andhare Vs Fuke ) यांनी आपला सत्य सांगत त्या म्हणाल्या, आमच्या घरगुती वादाबद्दल ज्येष्ठ राजकीय नेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे आणि श्रीमती रोहिणीताई खडसे यांनी आमच्या कुटुंबियांवर केलेले आरोप दुर्दैवी आणि समाजाची दिशाभूल करणारे आहेत.
 
- हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही अधिक बोलणे हा न्यायालयाचा अपमान होईल. पण जेव्हा आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचे प्रयत्न केले जातात, तेव्हा त्याबद्दल काही गोष्टी समाजासमोर आणणे ( Khadse Andhare Vs Fuke ) आवश्यक ठरते.
 
- मी माझा तरुण मुलगा गमावला आहे. त्या दुःखातून आम्ही अजूनही बाहेर पडलेलो नाहीत. मुलगा संकेत याचे निधन झाल्यानंतर आम्ही आमची सूनबाई प्रिया आणि आमच्या दोन्ही नातवंडांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव जाणवू नये यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत होतो. पण आमच्या नशिबात ते ( Khadse Andhare Vs Fuke ) नव्हते.
 
- माझे पती श्री. रमेश फुके आजारी असतात. त्यांना दोन्ही नातवंडांना भेटायची इच्छा होते. ते सुनेला हात जोडून विनंती करतात. पण नातवंडांना भेटू दिले जात नाही. काही अटींवर एखादेवेळी भेट घडवून दिली जाते. त्या अटी सांगितल्या तर मनस्ताप होईल.
 
- सून प्रिया यांना कोणत्या गोष्टींचा राग आहे, तिला कोणता बदला घ्यायचा आहे, हे अजूनही आम्हाला कळलेले नाही. कुटुंबात एकत्र बसून वाद संपवण्याचे आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो. आमची बदनामी करून त्यांना काय मिळत असेल ते देवच जाणो.
 
- आमच्याकडे प्रत्येक वेळी पैशाची मागणी केली जाते, आम्ही ती पूर्ण सुद्धा करतो. पण आमच्या कुटुंबात शांती राहू नये, असेच प्रयत्न केले जातात.
 
- श्रीमती सुषमाताई अंधारे आणि श्रीमती रोहिणीताई खडसे ( Khadse Andhare Vs Fuke ) यांनी एका महिलेची एकच बाजू समजून घेतली. मी सुद्धा महिला, आई आहे. माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी चर्चा केली असती किंवा मला एका शब्दाने सुद्धा विचारले असते तर त्यांना या प्रकरणातील वस्तुस्थिती मी सांगितली असती. आणि त्यानंतर त्यांचे डोळे सुद्धा उघडले असते.
 
- मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मी आजारी असते. त्यांनी खोटे आरोप करून मला प्रचंड मनस्ताप दिला आहे. हा कौटुंबिक वाद आहे. त्याला राजकीय वळण देण्याचे कारणच नाही.
 
- श्रीमती सुषमाताई अंधारे आणि श्रीमती रोहिणीताई खडसे ( Khadse Andhare Vs Fuke ) यांनी आमच्या घरातील वाद लोकांसमोर आणून राजकारण करू नये. त्यांच्या घरात सुद्धा असे वाद असतील. ते सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे.
 
- तरुण मुलगा गमावल्यानंतर कोणत्या आई- वडिलांना वाटणार आहे की, त्यांच्या सुनेला आणि नातवंडांना त्रास व्हावा ? कुणालाच असे वाटत नाही. आमच्या कुटुंबाला सुसंस्कृत घराण्याची परंपरा आहे. आमच्या घरात यापूर्वी असे वाद कधीही झालेले नाहीत.
 
- आमची सून प्रिया आणि नातवंड आनंदात आणि सुखात राहावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न केलेले आहेत. अजूनही तिची समजूत घालण्याचे आम्ही प्रयत्न करीत आहोत.
 
- श्रीमती सुषमाताई अंधारे आणि श्रीमती रोहिणीताई खडसे यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी सुद्धा आमच्या सुनेची आणि समाजाची दिशाभूल करू नये. आमच्या नातवंडांना सुखात आणि आनंदात ठेवण्यासाठी मदत करावी.
 
- कृपया आमच्या कुटुंबाची समाजाची बदनामी करू नये. किमान छोट्या नातवंडांच्या मनावर या गोष्टींचा किती नकारात्मक मानसिक परिणाम होत असेल याचा तरी या लोकांनी विचार करावा, ही विनंती.
 
अशा शब्दात या सर्व प्रकरणाची माहिती डॉ. रमा रमेश फुके ( Khadse Andhare Vs Fuke ) यांनी दिली आहे.