नागपूर : ( Sushma Andhare ) भाजप नेत्याच्या घरात 'हगवणे'प्रमाणेच एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे होत आहे. अंधारे यांनी प्रश्न विचारलं आहे की "सत्ताधाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत का ?" या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या भावसून प्रिया फुके यांच्यावर त्यांच्या सासरकडून अन्याय होत असून त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. त्यांना त्यांच्या मुलांचा ताबा मागितला जात आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली तर तासन्तास बसवून ठेवले जाते. या प्रकरणी फुकेंविरूध्द पुरावे देऊनही कारवाई ( Sushma Andhare ) होत नाही.
मुख्यमंत्र्यांवरही आरोप
मुख्यमंत्र्यांना भेटूनही न्याय मिळत नाही. फुके कुटुंबांचा सत्ताधारी भाजपसोबत संबंध आहे. ते मुख्यमंत्री फडणवीसांचा जवळचे आहेत. त्यामुळे कितीही छळ केला तरीही सत्ताधाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही, असे राज्यात चित्र निर्माण झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहीणी खडसे यांनी बुधवारी नागपुरात संयुक्त पत्रपरीषदेत केला. या प्रकरणी अंधारे आणि खडसे यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. एका महिलेच्या न्यायासाठी आम्ही आलो आहोत. यात राजकारण नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. यावेळी प्रिया फुके या उपस्थित होत्या.
अंधारे ( Sushma Andhare ) म्हणाल्या, प्रिया फुके यांनी पोलीसांवर गंभीर आरोप केले आहेत. महिला आयोगाकडेही चौकशीसाठी पत्र पाठविले. मात्र, दखल घेतली गेली नाही. 12 मे, 2025 रोजी विनयभंगाची तक्रार दिली. मात्र, उलट प्रिया फुकेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फुके कुटुंबीय त्यांच्या मुलांचा ताबा मागत आहे. तर, दिवंगत संकेत फुके हे त्यांचे पती असल्याने हिंदू विवाह कायद्यानुसार त्या संपत्तीत वाटा मागत आहेत. त्यांनी शारीरिक छळ केला, अशी तक्रार आहे. पण दखलच घेत नाही, असे अंधारे म्हणाल्या. महिला आयोगात चार वेळा तक्रारही दिली. मुख्यमंत्र्यांनाही तीनवेळा भेटली' अशी माहितीही त्यांनी दिली. रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांना समर्थन देण्यासाठी आलो असून, हा राजकारणाचा विषय नाही, असे स्पष्ट केले. सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. सरकारने लाडकी बहीण म्हणून त्यांना मदत करावी. महिला आयोगाकडून अपेक्षा आहेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
लग्नात झाली फसवणूक
प्रिया फुके यांनीही या वेळी फुके कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या,'मी माझ्या लाडक्या भावांना मदत मागितली. पण मदत मिळाली नाही. माझ्यासोबत उभ राहायला कुणी तयार नाही. लग्नापुवीं दोन वर्ष आधीच संकेतचे किडनी ट्रान्सप्लांन्ट झाले होते. फसवणूक करून लग्न करण्यात आले. ते 10 वर्षे सोबत होतो. भाजपने संकेत यांना मनपाची उमेदवारी दिली. मात्र, ती उमेदवारी परिणय फुके यांच्या पत्नीला देण्यात आली. मी त्या कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्यांच्या संपत्तीतही वाटा आहे. लग्नानंतरच मला त्रास देणे सुरू झाले. दीड वर्षापासून पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. सातत्याने धमकावले जाते. अॅट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल होतात.
महिला आयोग वेगळ्याच कामात व्यस्त
राज्याचा महिला आयोग पक्षाच्या कामात व्यस्त आहे. आयोग तक्रारींची दखल घेत नाही. चित्रा वाघ यांच्यावर टीका करत अंधारे म्हणाल्या त्या सोयीनुसार पलटतात. या प्रकरणी त्या महिलेवर दबाव टाकला का, याबद्दल माहिती घेतली जाईल. हा सिलेक्टीवपणा आहे. तोच तुमचा पक्षपातीपणा आहे, हा आमचा खरा आक्षेप असल्याचे अंधारे ( Sushma Andhare ) यावेळी म्हणाल्या.