Dube Pakistan Statement : दुबेंच्या दाव्याकडे जगाचे लक्ष म्हणाले, अनेक तुकड्यात विभागला पाकिस्तान

Top Trending News    04-May-2025
Total Views |

du
 
दिल्ली : ( Dube Pakistan Statement ) भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. निशिकांत दुबे यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, पाकिस्तानच्या लष्कराने रक्तपिपासू हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम यांना बलुच व भारतीय निदर्शकांना मारण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 15 दिवसांत 10 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. तर काही बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तानचे तुकडे ( Dube Pakistan Statement ) झाले आहेत.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तान मधील तणाव शिगेला पोहोचला आहे. तर यावेळी निशिकांत दुबे यांचे हे विधान परिस्थितीवर अधिकच परिणामकारक ठरत आहे. दोन्ही देशांमधील सुरक्षेबाबतच्या चिंताही वाढल्या आहेत. यामुळे दोन्ही बाजूंमधील राजनैतिक संबंध सर्वात खालच्या पातळीवर आहेत. पाकिस्तान अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला आहे. तेथे सुरू असलेल्या संघर्षात 10,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत, असे दुबे म्हणाले. पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांना बलुचांना संपवण्याचे निर्देश दिल्याचे दुबेंनी सांगितले.