War Asset Land Scam : भारत-पाक युद्धाच्या साक्षीदार भूमीवर भूमाफियांनी असा साधला डाव !

Top Trending News    04-May-2025
Total Views |

cou 
चंदीगड : ( War Asset Land Scam ) भारत-पाक युद्धातील हवाईपट्टीची विक्री झाल्याची घटना उघड झाली आहे. न्यायालयाने पंजाब दक्षता ब्युरोच्या संचालकांना या आरोपांची सत्यता वैयक्तिकरित्या तपासण्याचे आणि आवश्यक असल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.1962, 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये भारतीय सैन्याने या हवाईपट्टीचा वापर केला होता. निशान सिंग यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. या याचिकेत सीबीआय किंवा कोणत्याही स्वायत्त संस्थेकडून चौकशीची मागणी ( War Asset Land Scam ) करण्यात आली होती.
 
फिरोजपूरमधील फत्तुवाला गावात असलेल्या हवाईपट्टीच्या कथित फसव्या विक्री प्रकरणात पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. याचिकेप्रमाणे 1937-1938 मध्ये भारत सरकारने अधिग्रहित केलेली फत्तुवाला गावाची जमीन भारतीय सैन्याच्या ताब्यात होती. 1997 मध्ये महसूल नोंदींमध्ये छेडछाड करून ते विकल्याचा आरोप आहे. या जमिनीचे मूळ मालक मदन मोहन लाल यांचे 1991 मध्ये निधन झाले होते, असे न्यायालयाला सांगण्यात आले. काही वर्षांनी, 2009-10 च्या महसूल नोंदींमध्ये खाजगी व्यक्तींची नावे नोंदविण्यात आली. या काळात भारतीय सैन्याने कधीही या जमिनीचा ताबा दुसऱ्या कोणाला दिला नाही. फत्तूवाला येथील ही जमीन अजूनही लष्कराकडून लँडिंग ग्राउंड म्हणून वापरली जात आहे