MPs Attack : राक्षसाला जसं रक्त लागतं, तसं भाजपला लागतात दंगली ! खासदारांचा हल्लाबोल

Top Trending News    06-May-2025
Total Views |

pranit
सोलापूर :  ( MPs Attack )  राज्यात लाडकी बहीण योजनेचा गोंधळ उडाला आहे. पैशाच्या कमतरतेमुळे सामाजिक न्याय विभागाचे 700 कोटी रुपये बहिणींना द्यावे लागले असल्यामुळे पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्यात अडचण जात आहे. संघाच्या मानसिकतेमुळे महिलांवर अत्याचार होत आहेत, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केंद्राने बंद केली असून, राज्यातून दीड वर्षांपासून एकही प्रस्ताव गेलेला नाही, असे प्रणिती शिंदे  ( MPs Attack ) म्हणाल्या.
 
राक्षसाला जसे रक्त लागते, तसे भाजपाला दंगली लागतात, एक माणूस दहा हजार लोकांसमोर बोलतो, त्याला हिटलरशाही म्हणतात, असे म्हणत सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. प्रणिती म्हणाल्या की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या जातजनगणनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हा मुद्दा त्यांनी सातत्याने लावून धरला होता. कधीपर्यंत जातगणना करणार आहात, ते सरकारने लेखी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पहलगाम हल्ला झाला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये प्रचार करत होते, असा आरोप प्रणिती यांनी केला.