Mehbooba Mufti : पुलवामा हल्ल्यानंतर मेहबुबा मुफ्तींची विचित्र मागणी - व्याज माफ करा

Top Trending News    06-May-2025
Total Views |

mag
 
श्रीनगर : ( Mehbooba Mufti ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील 48 पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पहलगाम मधील 100 लोकांपेक्षा जास्त काश्मिरी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी आवाहन करत आहे की हे योग्य नाही. आज सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. येथे असणाऱ्या हॉटेल चालक आणि टॅक्सी चालकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
अशा परिस्थितीत पर्यटन स्थळांवर सुरक्षा दल तैनात करण्याची आवश्यकता आहे. तसेच, मी सरकारला आवाहन करते की पहलगाममध्ये पर्यटकांना घोडे पुरवणाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पर्यटनस्थळे बंद झाल्याने वर्षभरासाठी हॉटेल आणि टॅक्सी चालकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी केली. या पार्श्वभूमीवर पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती ( Mehbooba Mufti ) यांनी केंद्र सरकारकडे पुढील एक वर्षभरासाठी येथील हॉटेल आणि टॅक्सी चालकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.