Prison Terror Plot : पूंछमध्ये सापडले टिफिन बॉम्ब ! तुरुंगांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Top Trending News    06-May-2025
Total Views |
 

bo 
 
जम्मू : ( Prison Terror Plot ) भारत आणि पाकिस्तानमध्ये तसा नेहमीच तणाव असतो. मागील 11 दिवस पाकिस्ताकडून शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन सुरुच आहे. पहलगाम हल्ल्यानंतर रविवारी रात्री पाकिस्तानने सलग 11 व्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्‍तानच्‍या मुसक्‍या ( Prison Terror Plot ) आवळल्या आहे.
 
भारतीय सैन्याने पूंछमधील दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण उद्ध्वस्त केली आहेत. येथे 'टिफिन बॉम्ब' जप्त करण्यात आले असून, जम्‍मूमधील तुरुंगांवर हल्ला करण्‍याचा दहशतवाद्‍यांवा कट असल्‍याचा संशय गुप्तचर विभागाने व्‍यक्‍त केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील तुरुंगांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सूचित केले आहे. या संदर्भात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान पूंछमधील सुरनकोट येथे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. येथे तीन आयईडी टिफिन बॉक्समध्ये आणि 2 लोखंडी बादल्यांमध्ये होते. दहशतवादी जम्मूमधील कोट बलवाल तुरुंग आणि श्रीनगर मध्यवर्ती तुरुंगाला लक्ष्य करू शकतात. या तुरुंगांमध्ये दहशतवाद्यांपासून ते स्लीपर सेलमधील सदस्यांपर्यंत कैदी आहेत. आयईडी जप्त करण्यात आले आहेत.
 
सध्या याबाबत लष्‍काराने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4-5 मे च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या आसपासच्या भागात नियंत्रण रेषेवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने तातडीने प्रत्युत्तर दिले.