भटिंडा : ( Deadly Plane Crash On Farm ) पंजाबमधील भटिंडा येथील गव्हाच्या शेतात एक विमान कोसळल्याची घटना निदर्शनात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात शेतात विमानासारखे काहीतरी जळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक प्रत्यक्षदर्शी विमान शेतात कोसळल्याची पुष्टी करत आहे. जेव्हा लोकांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा विमानाचा त्या स्फोट झाला. आणि आगीच्या बऱ्याच ज्वाला निघू लागल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही तासातच आगीवर नियंत्रण ( Deadly Plane Crash On Farm ) मिळवले आहे.
एका व्यक्तीचा मृत्यू तर 9 जण जखमी
या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृताचे नाव गोविंद असून तो हरयाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले ( Deadly Plane Crash On Farm ) ते ठिकाण लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर आहे. ही घटना मंगळवारी रात्री 2 वाजता भटिंडातील गोनियाना मंडी येथील अकालियान कलान गावात घडली आहे. याचवेळी विमान शेतात पडले आणि लगेचच त्यानंतर त्याला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
हे कुणाचं आहे ? त्याचा मालक कोण आहे, याबद्दल अद्यापही कसलीच माहिती मिळालेली नाही. पायलट बद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. भटिंडातील ज्या ठिकाणी जखमींना दाखल करण्यात आले, त्या ठिकाणाबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. जखमींना भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. अपघातातील मृत गोविंद कुमार हे चरखी दादरी जिल्ह्यातील कबीर नगर येथील रहिवासी होते. ते 14 एप्रिल रोजी त्याच्या चार पुतण्यांसोबत पंजाबला बाजारात धान्य भरण्याचे काम करण्यासाठी गेले होते. त्यांच्या घरी पत्नी ममता, मुलगी परी आणि मुलगा प्रशांत आहेत.