मुंबई : ( Operation Sindoor Celebration ) भारतीय लष्करांकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री एअर स्ट्राइक केले. या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. या हल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलले जात आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत तब्बल नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूर नावाखाली एअर स्ट्राइक करण्यात आला करण्यात आहे. ह्या बातम्या समाज माध्यमावर झळकल्यानंतर पहाटेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडून आपला आनंद उत्सव साजरा ( Operation Sindoor Celebration ) करण्यात आला आहे.
अकोल्यात फटाके फोडून जल्लोष
या ऑपरेशनचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर आता देशभरात जल्लोष साजरा होत आहे. अकोल्यातील अग्रेसन चौकातील विश्व हिंदू परिषद आणि अकोलेकरांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे. तसेच, भारताने केलेल्या हल्ल्याचा गर्व असल्याचे अकोलेकरांनी प्रतिक्रिया ( Operation Sindoor Celebration ) व्यक्त केल्या आहेत.
पालघरमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव
पालघरच्या बोईसर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला आहे. भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान मोदींचा जयजयकार करत एकमेकांना पेढे भारावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
खेड वासियांकडून जल्लोष
खेडवासीयांनी फटाके फोडून आणि पेढे भरवून या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. सरकारने पाकिस्तानला अशी अद्दल घडवावी की भारतावर वाकडी नजर करताना त्यांना पुढचा जन्म आठवला पाहिजे . आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याची भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
पंढरपुरात पेढा वाटून आनंदोत्सव
ज्येष्ठ नागरिक व नागरिकांनी मॉर्निंग वॉक वेळी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी हिंदुस्तान जिंदाबाद, भारत माता की जय असा घोषणा देण्यात आला.
नागपूर मध्ये जल्लोष
भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे राज्यभरात स्वागत केले जात आहे. नागपूरमध्ये नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला तसेच भारत जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.