Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर मागील गुप्त मिशन ! वाचा थरारक मिनिट-दर-मिनिट कहाणी

Top Trending News    07-May-2025
Total Views |
 
sindoor
 
नवी दिल्ली : ( Operation Sindoor ) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. देशाच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईत 9 ठिकाणी हल्ला केला. या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' ( Operation Sindoor ) असे नाव देण्यात आले आहे. भारताच्या या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरची पाहणी केली.
 
लष्करी कारवाई
 
भारताच्या या कारवाईत १९७१ नंतर प्रथमच तिन्ही भारतीय लष्करी दलांनी संयुक्तपणे पाकिस्तानविरुद्ध केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ज्यात 'लोइटरिंग म्युनिशन्स' (स्वयं-ध्वंसात्मक ड्रोन) सारख्या अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. "ऑपरेशन सिंदूर" ( Operation Sindoor ) ही भारत सरकारने आज पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त भागातील दहशतवादी तळांवर केलेली कारवाई आहे. ज्याचा अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बदल भारत सरकारने घेतल्याने प्रत्येक नागरिकांच्या डोळयांतून आनंदाश्रू वाहत आहे.
 
'ऑपरेशन सिंदूर' ची वैशिष्ट्ये
 
ऑपरेशन सिंदूरच्या ( Operation Sindoor ) कारवाईची वेळ ७ मे २०२५ रोजी पहाटे १:४४ मिनिटांची होती. पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू-काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी तळांवर यशस्वी हल्ला करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, लष्कर-ए-तोयबाचे मुरिदके येथील तळ, कोटली, मेहमूना , बारनाला, सरजाल इत्यादी ठिकाणांवरील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.
 
मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुझफ्फराबाद शहराभोवती असलेल्या पर्वतांजवळ अनेक मोठे स्फोट ऐकू यायला लागले. या भयंकर स्फोटांनंतर शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यावेळी भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला केल्याची अधिकृत माहिती मिळाली ( Operation Sindoor ).
 
मिनिट-दर-मिनिटांची अशी कहाणी
 
१.४५ दुपारी - पाकिस्तान न्यूजमधील वृत्तानुसार, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
 
पहाटे १:४४ मिनिटांनी केलेल्या या हल्ल्यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचा वापर करण्यात आला. यामध्ये प्रिसिजन अटॅक वेपन सिस्टीमचा वापर करण्यात आला.
 
४.३२ वाजता : अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी एनएसए आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांच्याशी भारतीय हल्ल्याबद्दल चर्चा केली.
 
४.३५ वाजताच्या सुमारास भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाणाऱ्या अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.
 
५.०४ वाजता हल्ला झालेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे.
 
५.२७ वाजता : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो म्हणाले की, आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अमेरिकेला आशा आहे की हे लवकरच संपेल.
 
५.४५ वाजता : कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली.
 
६.०० वाजता - पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आहे आणि पूंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर गली भागात गोळीबार केला आहे.
 
६.०८ वाजता - ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले सर्व भारतीय वैमानिक आणि लढाऊ विमाने सुरक्षितपणे तळावर परतली.