( Drone War India Pakistan ) पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केल्यानंतर त्यावर प्रतिउत्तर देत हवेतच भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन आकाशातच उडविले आहे. पाकिस्तानकडून भारताच्या ३ राज्यांवर हल्ले करण्यात आले होते. यात जम्मू काश्मीर आणि अमृतसर या शहरांचा समावेश आहे. जे हल्ले परतवून लावण्यात भारताला यश आले आहे. ज्या चिनी खेळण्याच्या ( शस्त्रांच्या) जोरावर पाकिस्तान उडत होता ते शस्त्र भारताने नष्ट केले आहे. घाबरून पाकिस्तानने सर्वत्र ब्लॅक आऊट केलेलं आहे. आता पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली ( Drone War India Pakistan ) आहे.
या हल्ल्याचे प्रतिउत्तर देत भारताने पाकिस्तानच्या मोठ्या शहरामध्ये हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. भारताने लाहोरमध्ये ड्रोनने हल्ला केला आहे. लाहोर शहरातील डिफेन्स सिस्टिम भारताने निस्तेनाबून केली आहे. पाकिस्तानचे दोन JF- 17 आणि F-16 फायटर जेट भारताने पडल्याची माहिती मिळाली आहे. भारताच्या ड्रोन हल्ल्याचे चोख प्रतिउत्तर देण्याची आदेश अमित शाह यांची दिले आहे.