( Pak MP Cries In Parliament ) सद्याची पाकिस्तानची परिस्थिती पाहता पाकिस्तानला रडायलाही सुधारणार नाही, असे दिसत आहे. भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत पुन्हा हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह अनेक नेते भारताच्या कारवाईने घाबरले ( Pak MP Cries In Parliament ) आहेत. बुधवारी, भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हवाई हल्ले केले. तर दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, घाबरलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
दरम्यान, पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे खासदार ताहिर इक्बाल हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेत रडू लागले. अशी दयनीय परिस्थिती पाकिस्तानी खासदारांची झालीय आहे. विशेष म्हणजे हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पक्ष आहे. ताहिर इक्बाल यांनी पाकिस्तानी संसदेत म्हटले की अल्लाह आपले रक्षण करो.