Pakistan Breakup Prophecy : ८० वर्षांचा पाकिस्तान, आता पाच तुकड्यांमध्ये विखुरणार ! या नेत्याची धक्कादायक भविष्यवाणी

Top Trending News    08-May-2025
Total Views |

paki 
( Pakistan Breakup Prophecy ) मध्य प्रदेशातील इंदूर येथे ८ मेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी गुरुवारी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. काही लोक पाकिस्तानला "८० वर्षांचा म्हातारा" म्हणत आहे. आणि असा अंदाज लावत आहेत की जन्मापासून हिंसाचार आणि रक्तपात पाहणारा हा देश पाच तुकड्यांमध्ये विभागला जाईल. "पाकिस्तानचे काय होईल हे आम्हाला माहित नाही, परंतु लोक म्हणत आहेत की देशाचे पाच तुकडे होतील," असे कुमार यांनी इंदूरमधील ख्रिश्चन समुदायाच्या "गॅफकॉन-एबीसीआय नॉर्थ इंडिया लीडर्स कॉन्फरन्स" मध्ये ( Pakistan Breakup Prophecy ) सांगितले.
 
या देशाचा काळ संपला आहे, कारण जो जन्माला येतो तो मरतो.'' भारताच्या शाश्वत संस्कृतीचा उल्लेख करताना कुमार म्हणाले की, भारताची जन्मतारीख नाही, त्यामुळे ज्याचा जन्म नाही त्याचा मृत्यू नाही. परंतु, पाकिस्तान आणि बांगलादेशची जन्मतारीख आपण सर्वांना माहिती आहे. त्यामुळे जो जन्माला येईल त्याचा मृत्यू नक्कीच होईल. "काही लोक म्हणतात की पाकिस्तानच्या जन्मापासूनच तेथे हिंसाचार आणि रक्तपात झाला आहे," असे ते म्हणाले. ते असेही म्हणत आहेत की पाकिस्तान आता ८० वर्षांचा झाला आहे.